esakal | स्वच्छ सर्वेक्षणात जुन्नर पालिकेची कामगिरी अभिमानास्पद  
sakal

बोलून बातमी शोधा

ju.jpg

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेत जुन्नर शहराने २२ वा क्रमांक मिळविला असल्याची माहिती मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री यांनी दिली.

स्वच्छ सर्वेक्षणात जुन्नर पालिकेची कामगिरी अभिमानास्पद  

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर  : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेत जुन्नर शहराने २२ वा क्रमांक मिळविला असल्याची माहिती मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या स्पर्धेत देशातील ४ हजार २४२ शहरांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेतील उच्चतम कामगिरी करणाऱ्या शंभर शहरांची निवड केंद्र स्तरावर करण्यात आली होती. त्यात  देशात जुन्नर शहराने देशात २२ वा क्रमांक मिळवून बहुमान प्राप्त केला आहे.तसेच पश्चिम विभागात  २५ हजार ते ५९ लाख लोकसंख्या या श्रेणी मध्ये 'सर्वोकृष्ट स्वच्छ शहर" म्हणून दर्जा प्राप्त केला आहे. ही  जुन्नरच्या नागरिकांसाठी पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी केली आहे. 

शहर स्वच्छतेच्या चळवळीत सलग तीन वर्षे देशपातळीवर सातत्याने यशस्वी कामगिरी करत  एक नवा आदर्श जुन्नर शहराने निर्माण केला आहे. 'स्वच्छ सर्वेक्षण' स्पर्धेमध्ये जुन्नर शहराने कचरा निर्मितीच्या ठिकाणी १००% कचऱ्याचे वर्गीकरण,घरोघरी जाऊन कचरा संकलन, संकलित कचऱ्यावर शास्रोक्त पद्धतीने प्रक्रिया(खत निर्मिती),प्लॅस्टिक प्रक्रिया,घरगुती घातक कचरा प्रक्रिया असे विविध प्रकल्प यशस्वी केले आहेत.

 Unlock 4.0 : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याला 'एवढ्याच' नागरिकांची पसंती; सर्व्हे काय सांगतो पाहा

याबरोबर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरामुक्त शहरांचे तारांकित मानांकन या उपक्रमात जुन्नर शहराने थ्री स्टार मानांकन प्राप्त केले आहे. तसेच हागणदारी मुक्त शहर या उपक्रमातदेखील जुन्नर शहराने ओडीएफ+ मानांकन मिळवून देशपातळीवरील आपले स्थान कायम ठेवले आहे.

हे यश जुन्नर शहरातील नागरिकांच्या अमूल्य योगदानामुळे लाभले आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,पालिका अधिकारी, कर्मचारी, सर्व विविध संस्था,मंडळे,स्वयंसेवी संस्था,शाळा व पत्रकार आदी सर्वांचे स्वच्छता मोहिमेत अनन्यसाधारण महत्व आहे. -शाम पांडे, नगराध्यक्ष

'नासा'ला जमलं नाही ते 'आयुका'नं करून दाखवलं; अत्यंत दूरच्या दीर्घिकेचा घेतला शोध

नागरिकांचे सहकार्य असेच कायम राहील्यास जुन्नर शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी पार पाडेल. -मच्छिंद्र घोलप, मुख्याधिकारी

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

loading image
go to top