विदेशी स्कॉचच्या बाटल्यांतून विकायचे बनावट मद्य; पुण्यातील रॅकेटचा पर्दाफाश

Fake_Liquor
Fake_Liquor

पुणे : विदेशी स्कॉचच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट मद्य भरून विक्री करणाऱ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. मुळशी तालुक्‍यातील हिंजवडी येथील साखरे वस्ती येथे छापा टाकून स्कॉच बनविणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. 

या प्रकरणी नागा डाया चावडा (वय 37 रा. पांडवनगर, साखरे वस्ती, हिंजवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे, उप अधीक्षक एस.आर.पाटील आणि संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने (क्रमांक-1) ही कारवाई केली. 

हिंजवडी परिसरात बनावट स्कॉच तयार करण्यात येत असल्याची माहिती अधीक्षक झगडे यांना मिळाली. त्यावरून तेथे छापा टाकण्यात आला. त्यावेळी विविध ब्रॅंडच्या स्कॉचच्या तीनशे रिकाम्या बाटल्या, मद्य भरलेल्या 115 बाटल्या, बनावट लेबल असा सुमारे सव्वादहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए.बी. पवार, उपनिरीक्षक एस. आर. दाबेराव, ए.ए. सुतार, स्वप्नील दरेकर, चंद्रकांत नाईक आणि अंकुश कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. विदेशी स्कॉच मद्य अवैध ठिकाणांहून खरेदी करू नये. याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा. 
- संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com