पुणे - जिल्हा परिषद शाळांत राबवणार अस्मिता योजना

मिलिंद संगई
बुधवार, 4 एप्रिल 2018

बारामती (पुणे) : ग्रामीण भागातील महिला तसेच जिल्हा परिषद शाळातील अकरा ते एकोणीस वयोगटातील मुलींसाठी वैयक्तिक स्वच्छता व सॅनिटरी नॅपकिन्ससंदर्भात जाणीव जागृती करुन देण्यासाठी राज्यात शासनाकडून अस्मिता योजना राबविण्यात येणार आहे. 

या विषयाचे प्रबोधन व निर्माण होणा-या विविध समस्यांवर मात करण्यासाठी शासनस्तरावर हा निर्णय झाला आहे. मासिक पाळीच्या काळात शालेय वर्षात किमान पन्नास ते साठ दिवस विद्यार्थीनी अनुपस्थित राहतात ही बाब पुढे आली आहे. महिला व मुलींनी वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याची काळजी या बाबत प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. 

गावपातळीवरील उमेदपुरस्कृत स्थापन केलेल्या स्वयंसहायता समूह व आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन्सबाबत जाणीव व जागृती करणे व माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अस्मिता योजना शासनाने हाती घेतली आहे. 

अशी असेल योजना -
-    बचत गटामार्फत जाणीव जागृती करणे
-    सॅनिटरी नॅपकिन्सची मागणी नोंदविणे व पुरवठ्यासाठी अँपनिर्मितीस मान्यता
-    बचत गटांनी गावाची एकत्रित मागणी अँपवर नोंदवावी
-    तालुका स्तरावरील वितरकाकडे पुरवठादाराने नॅपकिन्स द्यावेत
-    बचत गटांनी एमआरपीनुसार नॅपकिन्सची विक्री करावी
-    शालेय विद्यार्थींनींना बचत गटांनी पाच रुपये प्रति नॅपकिन दराने विक्री करावी
-    महिलांना माफक दरात नॅपकिन द्यावेत
-    आरोग्य विभागाकडून हाती घेतलेल्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेशी संलग्न करुन अस्मिता योजना राबविली जाणार आहे. 
-    योजनेच्या प्रसार प्रचारासाठी एक कोटींची तरतूद
-    लाभार्थ्यांना अस्मिता कार्ड वितरीत केले जाणार
-    उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नोडल एजन्सी.

Web Title: execution of asmita yojana in pune zp schools