कुकडी पाटबंधारे कार्यकारी अभियंता पदी कानडे

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 6 जुलै 2018

जुन्नर (पुणे) : कुकडी पाटबंधारे विभाग क्र.1, नारायणगावचे कार्यकारी अभियंता म्हणून आज (ता.6) कि.बा.कानडे यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते डिंभे धरण विभाग मंचर येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. कुकडी पाटबंधारे विभाग क्र.1, नारायणगावचे कार्यकारी अभियंता जी.बी.नान्नोर यांची नारायणगाव येथुन डिंभे धरण विभाग,मंचर येथे बदली झाली आहे.

गेल्या चार वर्षांपासून नान्नोर नारायणगाव येथे कार्यरत होते. आज सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कानडे यांचे स्वागत व नान्नोर यांना निरोप देण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: executive engineer kukadi kanade