सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षारंभानिमित्त विद्यापीठात प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai phule pune university

महात्मा फुले यांनी पुण्यात २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. २४ सप्टेंबर २०२२ रोजी सत्यशोधक समाजाला १४९ वर्षं पूर्ण होऊन दिडशेव्या वर्षात पदार्पण करत आहे.

सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षारंभानिमित्त विद्यापीठात प्रदर्शन

पुणे - महात्मा फुले यांनी पुण्यात २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. २४ सप्टेंबर २०२२ रोजी सत्यशोधक समाजाला १४९ वर्षं पूर्ण होऊन दिडशेव्या वर्षात पदार्पण करत आहे. या ऐतिहासिक घटनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून इतिहास विभागातर्फे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील संग्रहालयात सत्यशोधक साहित्याचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीतून मिळविलेल्या सत्यशोधक साहित्यासह विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय, फर्ग्युसन कॉलेजचे वाडिया ग्रंथालय, शाहू वाचनालय काकडवाडी, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मृती ग्रंथालय (कुकाणे), शिवाजी विद्यापीठ येथील ग्रंथालय अशा विविध ग्रंथालयांमधून सत्यशोधक साहित्याच्या प्रती जनतेला पाहण्यासाठी यावेळी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सत्यशोधक विचारांची पुस्तके, वृत्तपत्रे आणि कार्यकर्त्यांची माहिती या प्रदर्शनात मांडली जाईल, अशी माहिती विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी दिली.

विद्यापीठाच्या ब्रिटिशकालीन मुख्य इमारतीत पहिल्या मजल्यावरील इतिहासविषयक संग्रहालयामध्ये विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. त्याचदिवशी हे प्रदर्शन सकाळी दहा ते दुपारी चार या वेळात सुरू राहणार आहे.

Web Title: Exhibition In University Occasion Of Centenary Golden Jubilee Year Of Satya Shodhak Samaj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..