pune satara highway
sakal
पुणे - पुणे - सातारा महामार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व एम. डी. इन्फ्रा कंपनीने मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व सेवा रस्त्याचे विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले आहे. या मार्गावर सेवा रस्त्याची रुंदी पूर्वी दोन मार्गिकेची होती, ती आता एकाने वाढून आता सेवा रस्ता तीन मार्गिकेचा झाला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत व सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.