Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal

Pune News : पुणे महापालिकेच्या भरतीतून अनुभवाची अट ‘बडतर्फ’

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीसाठी अनिवार्य असलेली तीन वर्षाची अनुभवाची अट सेवा प्रवेश नियमावलीतून ‘बडतर्फ’ करण्यात आली आहे.

पुणे - महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीसाठी अनिवार्य असलेली तीन वर्षाची अनुभवाची अट सेवा प्रवेश नियमावलीतून ‘बडतर्फ’ करण्यात आली आहे. यापुढे अनुभवी तसेच फ्रेशर अभियंत्यांना भरतीसाठी अर्ज करता येईल आणि लेखी परिक्षेतील गुणवत्ता यादीतील क्रमांकावर नोकरी सुद्धा मिळवता येणार आहे. अनुभव सिद्ध करण्यासाठी कागदपत्रांचा जुगाड करण्याची गरज पडणार नाही.

यासंदर्भातील आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढला आहे. दरम्यान कनिष्ठ अभियंत्यांच्या १०० जागांसाठी पुढच्या १० दिवसात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

महापालिकेने २०१४ मध्ये सेवा प्रवेश नियमावली तयार केली. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी ३ वर्षाचा अनुभव अनिवार्य असल्याची अट टाकण्यात आली होती. पण ही अट उमेदवारांसाठी तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली. गेल्यावर्षी १३५ कनिष्ठ अभियंता पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आली.

लेखी परिक्षेनंतर कागदपत्र पडताळणीसाठी बोलविण्यात आलेल्या उमेदवारांना तीन वर्षाचा अनुभव सिद्ध करणारी कागदपत्र सादर करणे आवश्‍यक होते. यामध्ये प्राप्तिकर विवरणपत्र, भविष्य निर्वाह निधीची कागदपत्रे, बँकेचे स्टेटमेंट, सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र आदी पुरावे सादर करणे आवश्यक होते. ज्यांच्याकडे तीन वर्षाचा अनुभव नव्हता त्यांनी बनावट कागदपत्र सादर केली होती. याप्रकरणी तिघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

तर कारवाईच्या भीतीने अनेकांनी नोकरी स्वीकारली नाही. अनुभवाच्या अटीमुळे आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याने महापालिकेने ही अट काढून टाकावी यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार त्यास नऊ महिन्यानंतर मान्यता मिळाली आहे.

म्हणून जाहिरात लांबवली

महापालिकेला कनिष्ठ अभियंत्यांची गरज आहे. १३५ जणांची भरती केल्यानंतर आणखी १०० जागा भरल्या जाणार आहेत. पण अनुभवाची अट रद्द झाल्यानंतरच यासंदर्भातील जाहिरात काढली जाईल असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. महापालिकेने फेब्रुवारी २०२३ मध्ये राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता, त्यास १४ डिसेंबर रोजी मान्यता देऊन शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे आता जाहिरात काढली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com