शाळांतील पथदर्शी प्रयोगांची ‘इनोव्हेशन बॅंक’

शुक्रवार, 4 जानेवारी 2019

पुणे - मराठी शाळांमधील विद्यार्थी चुणूकदार व्हावा म्हणून अनेक शिक्षक झटत असतात. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग आणि उपक्रमातून ते शाळा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधत असतात. याच पथदर्शी प्रयोगांचा आधार घेत इतर शाळांना, शिक्षकांना त्यांचे अनुकरण करावे म्हणून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतील उत्कृष्ट प्रयोगांची पुण्यातील विद्या परिषदेने ‘इनोव्हेशन बॅंक’ केली आहे.

पुणे - मराठी शाळांमधील विद्यार्थी चुणूकदार व्हावा म्हणून अनेक शिक्षक झटत असतात. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग आणि उपक्रमातून ते शाळा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधत असतात. याच पथदर्शी प्रयोगांचा आधार घेत इतर शाळांना, शिक्षकांना त्यांचे अनुकरण करावे म्हणून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतील उत्कृष्ट प्रयोगांची पुण्यातील विद्या परिषदेने ‘इनोव्हेशन बॅंक’ केली आहे.

अध्यापनाचे काम करताना शिक्षकांमधील कौशल्य वापरले जावे, अधिकाऱ्यांनीदेखील त्यांच्यामधील बुद्धिमत्तेचा वापर करून शिक्षण विभागाला आणि शैक्षणिक गुणवत्तेला उंची द्यावी म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (विद्या परिषद) राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यास सुरवात केली आहे. त्यात शिक्षकांबरोबरच अधिकाऱ्यांना भाग घेता येईल. जिल्हा स्तर, प्रादेशिक विद्या प्राधिकरण स्तर, तर दुसरा टप्प्यात राज्य स्तर अशी स्पर्धा होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे. राज्यभरातून आलेल्या प्रत्येक गटातील उत्कृष्ट पाच उपक्रमांना पारितोषिकेदेखील दिले जातात. फेब्रुवारीमध्ये त्याचे वितरण केले जाते.

विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता सुधार, पर्यावरण, आरोग्य, अध्यापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांवर नावीन्यपूर्ण उपक्रम या स्पर्धेत उतरविले जातात. यातून शाळेतील शिक्षक आणि या विभागातील अधिकाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. नवोपक्रम स्पर्धेसाठी आतापर्यंत दीडशे उपक्रम आले आहेत. यात आणखी शाळांनी सहभागी व्हावे म्हणून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आठ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व उपक्रम आल्यानंतर त्याचे तज्ज्ञांकडून मूल्यमापन केले जाणार आहे. या वर्षी प्रत्यक्ष शाळेत जाऊन तसेच स्पर्धकाने केलेले सादरीकरण पाहून मूल्यमापन केले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी : http://maa.ac.in/innovation२०१८-१९ 
वेब पोर्टलची निर्मिती

परिषदेच्या संशोधन विभागातील अधिकारी डॉ. गीतांजली बोरूडे म्हणाल्या, ‘‘चांगल्या उपक्रमांची प्रेरणा घेऊन, अन्य शाळांनी त्याचे अनुकरण करावे म्हणून हे उपक्रम त्यांच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी वेब पोर्टल तयार केले आहे. त्यावर इनोव्हेशन बॅंक आहे. यात चांगल्या उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे. ते पाहून शाळांना त्याचे अनुकरण करता येईल. दरवर्षी होणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेतील चांगले प्रयोग यावर उपलब्ध करून दिले जातील.’’

Web Title: Experiments Innovations Bank in marathi school