

Pune Doctors Seek Policy Shift at BJ Medical College; Benefits Explained
sakal
पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाची (बीजे) स्वायत्तता डावलली गेली आहे. सर्वांत आधी मागणी करूनही डावलले गेल्याने या मुद्द्यावर रान पेटले आहे. स्वायत्तता मिळाली तर महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या कामकाजात मोठे बदल होणार आहेत. ‘बीजे’च्या स्वायत्ततेचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी पुढे येत असून मुंबई, नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयानंतर स्वायत्ततेच्या यादीत ‘बीजे’चा समावेश होईल का नाही याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.