बारावीच्या विद्यार्थ्यांनो, फिजिक्स विषयाचा बदललेला अभ्यासक्रम कसा आहे? जाणून घ्या

HSC-Physics
HSC-Physics

पुणे : बारावीचा भौतिकशास्राचा बदललेला अभ्यासक्रम राष्ट्रीय अभ्यासक्रमाशी मिळताजुळता असल्यामुळे मुलांना निश्चितच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षेसाठी याचा उपयोग होईल, असे विषय तज्ज्ञांचे मत आहे.

भौतिकशास्त्राचा नवा अभ्यासक्रम लागू होत आहे. या विषयात 70 गुणांसाठी लेखी परीक्षा आणि 30 गुणांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे. लेखी परीक्षेसाठी परीक्षापद्धत (पेपर पॅटर्न) हा सध्याच्या अकरावीसारखाच असणार आहे. भौतिकशास्त्रात अनेक अवघड संकल्पना असतात. या पुस्तकात ह्या संकल्पना विविध उदाहरणांच्या साहाय्याने सोप्या करण्याचा प्रयत्न केला आहे. संकल्पनांमध्ये सुस्पष्टता येण्यासाठी अनेक उदाहरणे (गणिते) सोडवून दिली आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अकरावीमध्ये शिकलेल्या प्रकरणांचा उपयोग बारावीमध्ये योग्य प्रकारे केला आहे. जर विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पुस्तक वाचले, संकल्पना समजून घेतल्या आणि त्यावरील दिलेली उदाहरणे सोडवली, तर ते निश्चितच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षांना यशस्वीरित्या सामोरे जावू शकतील.

राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा (जेईई-नीट) या सीबीएसई अभ्यासक्रमानुसार असतात, पण भौतिकशास्त्राचा अकरावी आणि बारावीचा अभ्यासक्रम हा सीबीएसईच्या अभ्यासक्रमाप्रमाणे केला आहे. अभ्यासक्रम हा क्रियाआधारित, प्रायोगिक आणि नाविन्यपूर्ण शिक्षण देणारा आहे.

सिटी प्राइड स्कूलमधील शिक्षक प्रशांत अमृतकर म्हणाले, "अभ्यासक्रम हा सहा वेगवेगळ्या युनिटमध्ये विभागला आहे. या सहा युनिटची चौदा प्रकरणांमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक डेरीव्हेशन हे सोपे आणि सुटसुटीत देण्याचा प्रयत्न केला आहे. आवश्यक तेथे रंगीत आकृत्यांचा उपयोग केला आहे. भरपूर उदाहरणे सोडवून दिली आहेत. विद्यार्थ्यांना सरावासाठी भरपूर उदाहरणे दिली आहेत. मुलांना भरपूर प्रायोगिक ज्ञान या अभ्यासक्रमातून मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com