esakal | बारामतीच्या आंब्याची लंडनला लागणार गोडी  
sakal

बोलून बातमी शोधा

MANGO

बारामती येथील आंब्याची चव आता लंडनवासीय चाखणार आहेत. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या द्राक्ष व डाळिंब निर्यात केंद्रातून काल प्रायोगिक तत्त्वावर समुद्रमार्गे सोळा टन आंबा निर्यात झाला.

बारामतीच्या आंब्याची लंडनला लागणार गोडी  

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती येथील आंब्याची चव आता लंडनवासीय चाखणार आहेत. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या द्राक्ष व डाळिंब निर्यात केंद्रातून काल प्रायोगिक तत्त्वावर समुद्रमार्गे सोळा टन आंबा निर्यात झाला. 

पुण्याच्या इतिहासातील 'ती' काळी तारीख...ढगफुटी...आंबिल ओढा..अन्...  


भारतातील निर्यातदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेम्बो इंटरनॅशनल यांच्या वतीने सन 2015 पासून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीतून 17 देशांमध्ये आंबा निर्यात सुरु आहे. कोरोनाच्या काळातही लॉकडाऊनसह विविध निर्बंधाचा मुकाबला करत 25 एप्रिलपासून इंग्लंड, स्वित्झर्लंड, जर्मनी येथे हवाई मार्गे 240 टन, तर समुद्रामार्गे सोळा टन आंबा निर्यात केल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित भसाळे यांनी दिली. 

मोटार विहिरीत कोसळून महिलेसह दोन बालकांचा मृत्यू

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या द्राक्ष व डाळिंब निर्यात केंद्रातून काल समुद्रमार्गे सोळा टन आंबा निर्यात झाला. हा आंबा 21 दिवसांच्या सागरी प्रवासानंतर इंग्लंडच्या फेलिक्सस्टोव्ह बंदरात उतरणार आहे. सागरी वाहतुकीसाठी प्रसिध्द असलेल्या मर्क्स या कंपनीच्या सहकार्याने नियंत्रित वातावरणाच्या कंटेनरमधून हा आंबा निर्यात होत आहे. या प्रसंगी सभापती अनिल खलाटे, सचिव अरविंद जगताप, निर्मला भोईटे, निर्यातदार अभिजीत भसाळे व चंद्रकांत भसाळे आदी उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हा प्रयोग यंदा यशस्वी झाल्यास पुढील वर्षी कोकणातील हापूस व पुणे उर्वरित महाराष्ट्रातील केशर आंबा निर्यात होऊ शकेल. हवाई निर्यातीच्या पार्श्वभूमीवर सागरी निर्यात स्वस्त असल्याने युरोपमधील ग्राहकांना वाजवी दरात आंबा पुरवणे शक्य होईल. त्यामुळे ग्राहकांची संख्या वाढेल, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे व सचिव अरविंद जगताप यांनी व्यक्त केले.