
कोरोनामुळे जगभरात लॉकडाउन केल्याने त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला. परंतु, लॉकडाउन आणि अनेक गोष्टींवर निर्बंध असूनही राज्य कृषी पणन मंडळाने ४४ निर्यात सुविधा केंद्रांवरून विविध देशांत भरघोस कृषिमाल निर्यात केला. राज्यातून एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल १६ लाखांहून अधिक मेट्रिक टन शेतमालाची निर्यात केली, तर ४८७८.९७ कोटी रुपयांचा माल निर्यात केला.
पुणे - कोरोनामुळे जगभरात लॉकडाउन केल्याने त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला. परंतु, लॉकडाउन आणि अनेक गोष्टींवर निर्बंध असूनही राज्य कृषी पणन मंडळाने ४४ निर्यात सुविधा केंद्रांवरून विविध देशांत भरघोस कृषिमाल निर्यात केला. राज्यातून एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल १६ लाखांहून अधिक मेट्रिक टन शेतमालाची निर्यात केली, तर ४८७८.९७ कोटी रुपयांचा माल निर्यात केला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जागतिक व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फळे व भाजीपाल्यास परदेशी बाजारपेठेच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. राज्यातून द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, संत्रा, कांदा, भाजीपाला (भेंडी, कारले, शेवगा, तोंडली, हिरवी मिरची) या कृषिमालाची निर्यात होते. पणन मंडळाने विशेष निर्यात कक्ष स्थापला असून त्यामार्फत राज्यातील शेतमालाची निर्यात सुरळीत करण्यासाठी मालाची उपलब्धता, इतर आनुषंगिक मालाची वाहतूक, जेएनपीटी येथून कंटेनरची उपलब्धता, फायटोप्रमाणपत्र उपलब्धता याबाबत निर्यातदार व निर्यातीशी संबंधित सर्व घटकांना मार्गदर्शन केल्याचे कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले.
रक्तपेढ्यांनी जादा शुल्क आकारल्यास कारवाई
या देशात होतो शेतमाल निर्यात
अमेरिका, जपान, कॅनडा, जर्मनी, युरोपियन देश, नेदरलॅंड, रशिया, थायलंड, कॅनडा, न्यूझीलंड, यू. के., सिंगापूर, चीन, नेपाळ, इराण व दुबई.
गड्या आपला देशच बरा; पर्यटकांची परदेशाकडे पाठ
कोरोनाच्या काळात राज्यातून समाधानकारक निर्यात झाली. शेतकऱ्यांनी दाखवलेली जिद्द, पणनमंत्री व राज्यमंत्री यांनी दिलेली दिशा आणि पणन विभागाच्या प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने चोवीस तास सुरू ठेवलेल्या कंट्रोल रूम आणि सुसज्ज निर्यात सुविधा केंद्रांमुळे हे शक्य झाले.
- सुनील पवार, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे
Edited By - Prashant Patil