
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबलेलं पर्यटन जग आता पुन्हा सुरळीत होत आहे. त्यात हॉटेल आणि ट्रॅव्हल कंपन्यांकडून देण्यात येत असलेल्या चांगल्या ‘ऑफर’मुळे पर्यटनाची आवड असलेल्यांची मुशाफिरी पुन्हा सुरू झाली आहे. मात्र कोरोनाचे संकट अद्याप सरले नसल्याने पर्यटक परदेशाऐवजी देशातील स्थळांनाच पसंती देत आहेत.
पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबलेलं पर्यटन जग आता पुन्हा सुरळीत होत आहे. त्यात हॉटेल आणि ट्रॅव्हल कंपन्यांकडून देण्यात येत असलेल्या चांगल्या ‘ऑफर’मुळे पर्यटनाची आवड असलेल्यांची मुशाफिरी पुन्हा सुरू झाली आहे. मात्र कोरोनाचे संकट अद्याप सरले नसल्याने पर्यटक परदेशाऐवजी देशातील स्थळांनाच पसंती देत आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ख्रिसमसच्या निमित्ताने सध्या गोवा आणि कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनामुळे खबरदारीचा भाग म्हणून नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कमी करत स्वतःच्या वाहनांमधून हा पल्ला गाठत आहेत. तर काही जण ट्रॅव्हल कंपन्यांच्या गाड्या भाड्याने घेत आहेत. कोरोनापूर्वी अनेक लोकांनी परदेशात फिरायला जाण्याचे नियोजन केले होते; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांचे नियोजन फिस्कटले. त्यामुळे सध्या देशातील पर्यटनस्थळांना भेट देण्याला नागरिकांची पसंती आहे.
रक्तपेढ्यांनी जादा शुल्क आकारल्यास कारवाई
पर्यटनाची हौस असलेले कुलदीप गोसावी याबाबत म्हणाले, ‘‘परिवारासोबत बाहेर जाण्याची इच्छा होती. त्यात गोव्याच्या टूरसाठी चांगली ‘ऑफर’ मला ट्रॅव्हल कंपनीकडून मिळाल्याने यंदा ख्रिसमस आणि नवीन वर्ष गोव्यात साजरा करणार आहे.’
रशियाच्या लशीची पुण्यात मानवी चाचणी
अनलॉकमुळे सध्या आमच्या व्यवसायाला सुरुवात होत असून, पर्यटकांनाही काही सवलती आम्ही देत आहोत. त्यामुळे हळूहळू पर्यटक देखील पर्यटनासाठी पसंती दाखवत आहेत.
- आनंद मिश्रा, ट्रॅव्हल व्यावसायिक
पुणेकर थंडीने गारठले!; किमान तापमान १०.४ अंश सेल्सिअसची नोंद
Edited By - Prashant Patil