घरगुती सिलिंडरमधून गॅस काढून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

Cylinder.jpg
Cylinder.jpg

वाघोली : घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस काढून व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून ते विकणाऱ्या टोळीचा लोणीकंद पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्दे माल हस्तगत करण्यात आला आहे. 


सुनील जगाराम विष्णोई (वय 22), राजेश सैराम बिष्णोई (वय 27), कैलास बाबूराम बिष्णोई (वय 24), गोपाल बाबूराम बिष्णोई (वय 23), श्रावण खमूराम बिष्णोई (वय 29), कैलास बिरबलराम बिष्णोई (वय 20 सध्या रा.वाघोली) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद येथील गट नं 1506 मध्ये काही व्यक्ती जण गॅस सिलिंडर रिफिलींग करत आहेत, अशी गोपनीय माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. पोलिसांनी ही माहिती तहसीलदार हवेली, पुरवठा अधिकारी हवेली यांना कळविली. यानंतर या पथकाने एम.एस. चौधरी यांच्या मालकीच्या गोडाऊनवर छापा टाकला.

यावेळी सहा व्यक्ती भरलेल्या गॅस सिलिडंरमधून एक ते दीड किलो गॅस काढून दुसऱ्या गॅस सिलिंडरमध्ये भरताना आढळून आले. त्यांना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व वाघोलीतील प्रियंकानगरी येथील सुमीत शिंदे यांच्या भारत गॅस कंपनी एजन्सी गोदाम मधून सिलिंडर नेत होते. त्यांच्याकडून 194 गॅसने भरलेले सिलिंडर,27 रिकामे सिलिंडर,3 डिजिटल वजन काटे, चार लोखंडी पाइप, चार ऍप्पे पियागो टेम्पो सह एक 407 टेम्पो असा एकूण सुमारे 14 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, तहसीलदार सुनील कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, संजय भोसले, किशोर शिंगोटे, चांवस गवंडी, गणेश ससाणे, पोलिस कर्मचारी बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, राजीव शिंदे, संतोष माकड, समीर पाळणे, ऋषिकेश व्यवहारे, सूरज वळेकर, दत्ता काळे, गुंडकर या पथकाने ही कामगिरी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com