esakal | पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Municipal-Facility

पुण्यात डिसेंबर आणि जानेवारीत कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने स्वत:च्या रुग्णालयांतच ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर बेड विस्तारण्याचे नियोजन केले आहे. या काळात रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार देण्यासाठी पावणेदोन हजार ऑक्‍सिजन बेड आणि किमान सहाशे अतिदक्षता विभागातील बेड उपलब्ध राहतील, असे नियोजन केले आहे. या वाढणाऱ्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलऐवजी महापालिकेच्या रुग्णालये, जम्बो कोविड केअर सेंटरमध्येच उपचार देण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे.

पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात डिसेंबर आणि जानेवारीत कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने स्वत:च्या रुग्णालयांतच ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर बेड विस्तारण्याचे नियोजन केले आहे. या काळात रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार देण्यासाठी पावणेदोन हजार ऑक्‍सिजन बेड आणि किमान सहाशे अतिदक्षता विभागातील बेड उपलब्ध राहतील, असे नियोजन केले आहे. या वाढणाऱ्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलऐवजी महापालिकेच्या रुग्णालये, जम्बो कोविड केअर सेंटरमध्येच उपचार देण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात गेल्या २० दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच नागरिकांच्या तपासण्याही कमी केल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. 

रोजचा कोरोना संसर्गाचा ३०-३२ टक्‍क्‍यांवर असलेला आकडा आता २२ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आल्याचे महापालिकेने सांगितले. त्यामुळे पुणेकरांना थोडाफार दिलासा मिळत असल्याचे दिसत आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्येही रुग्णसंख्या फार काही वाढणार नसल्याचे केंद्रीय पथकाने महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे; परंतु डिसेंबर-जानेवारीत रुग्ण वाढण्याची भीती पथकाने वर्तविली आहे. त्यावर उपाययोजना करण्याची सूचनाही या पथकाने केली आहे. त्याअनुषंगाने महापालिकेच्या रुग्णालयांतील सुविधा विस्तारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पुण्यातील 68 वर्षीय आजोबांना नडला डेटिंगचा मोह!

महापालिकेच्या नायडू रुग्णालयासह दळवी, लायगुडे, खेडेकर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचाराची सोय केली आहे. या ठिकाणी ऑक्‍सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे. त्याशिवाय बाणेरमधील महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये ३१४ रुग्णांना समावून घेण्याची क्षमता आहे.

कोरोना रोखण्याच्या उपायांसोबत विशेषत: रुग्णांवरील उपचार पद्धतीत बदल केला आहे. नव्या उपचारांमुळे रुग्ण बरे होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. दुसरीकडे, रुग्णांना मोफत उपचार मिळण्यासाठी रुग्णालयात बेड वाढविण्यात येतील.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका

‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

महापालिकेची तयारी

  • व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेड आणखी वाढवणार
  • ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरळीत करणार 
  • ज्येष्ठ नागरिक आणि अन्य आजार असलेल्यांची तपासणी करणार

गरजेनुसार अँटिजेन चाचणी
तीव्र आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने ‘आरटीपीसीआर’ आणि गरजेनुसार ‘अँटिजेन’ चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर रुग्णांना लगेचच उपचारासाठी दाखल करून घेण्याची व्यवस्था केली आहे. चाचणी आणि तत्काळ उपचारामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होईल, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले. ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासण्या करण्यात येणार आहेत, असेही सांगण्यात आले. 

सर्व्हेसाठी घरामागे एक रुपया; तोही मिळत नाही; आशा स्वयंसेवकांची व्यथा

काय काळजी घ्याल?

  • नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता जोपासावी
  • ताप, सर्दी, खोकल ही लक्षणे जाणवताच तपासणी करून घ्यावी. 
  • विनाकारण घराबाहेर जाणे टाळा
  • कोरोनाचे निदान होताच औषधोपचाराला प्राधान्य द्या

Edited By - Prashant Patil

loading image
go to top