esakal | विस्तारित मेट्रोला आज तरी मंजुरी?
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Metro Trial

विस्तारित मेट्रोला आज तरी मंजुरी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेत गेली तीन वर्षे चर्चेच्या पातळीवर अडकलेल्या स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाला बुधवारी तरी सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळणार का?, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. महापालिकेची मंजुरी मिळाल्यावर राज्य व केंद्र सरकारची मंजुरी आणि निधीची तरतूद करावी लागेल. त्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकते.

हेही वाचा: कर्णबधिर जोडप्याची उद्योजकतेत ‘श्वेत’भरारी

स्वारगेट-कात्रज या ५.४६ किलोमीटरच्या भुयारी मार्गाच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव जुलै महिन्यापासून महापालिकेत प्रलंबित आहे. सर्वसाधारण सभेचे कामकाज लांबणीवर पडल्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारकडील प्रक्रिया अद्याप बाकी आहे. पिंपरी चिंचवड-स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सुमारे ६० टक्के पूर्ण झाले आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन अल्पावधीत होणार आहे. या मार्गाचे विस्तारीकरण स्वारगेटवरून कात्रजपर्यंत तर, पिंपरीवरून निगडीपर्यंत होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने पिंपरी-स्वारगेट मार्गाचा प्रकल्प अहवाल मंजूर करून राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे सादर केला आहे. मात्र, पुणे महापालिकेचा स्वारगेट-कात्रज भुयारी मार्गाचा अहवाल अद्याप राज्य सरकारकडे पोचलेला नाही.

  • प्रकल्प अहवाल करण्यास महापालिकेची मंजुरी ः १५ मे २०१८

  • महामेट्रोकडून प्रकल्प अहवाल सादर ः १७ सप्टेंबर २०१९

  • स्थायी सभेची मंजुरी ः १७ मार्च २०१२१

  • प्रस्तावातील आर्थिक तरतुदीत बदल ः ६ एप्रिल २१

  • स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रोचा खर्च : ४ हजार २८३ कोटी

loading image
go to top