सकाळ ढोल-ताशा स्पर्धेला उद्यापर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

पुणे - राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. ढोल-ताशा हा या उत्सवाचा अविभाज्य भाग. ‘सकाळ’ने ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. 

पुणे - राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. ढोल-ताशा हा या उत्सवाचा अविभाज्य भाग. ‘सकाळ’ने ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. 

या स्पर्धेसाठी आपल्या पथकाचा वादनाचा दहा मिनिटांचा व्हिडिओ चांगल्या कॅमेऱ्यावर किंवा हाय-रेझोल्युशन मोबाईलवर शूट करायचा. (मोबाईल आडवा धरून शूट करावे) आणि आमच्याकडे पेनड्राईव्हमध्ये लोड करून किंवा शूट केलेला मोबाईल प्रत्यक्ष आणून २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात पोचवायचा.  वाचकांच्या ज्या व्हिडिओला सर्वात जास्त लाइक्‍स, व्हुवज, शेअर्स आणि कॉमेंट्‌स मिळतील ते पथक विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ५० हजार, २५ हजार आणि १५ हजार रुपयांची पारितोषिके दिली  जातील. 

व्हिडिओ webeditor@esakal.com या ई-मेल ॲड्रेसवर आपण पाठवू शकता. ई-मेल पाठविण्यासाठी गुगल ड्राइव्हचा वापरही आपण करू शकता. ई-मेलमध्ये आपला संपर्क क्रमांक आणि पथकाचे नाव अत्यावश्‍यक आहे.

स्पर्धेच्या अटी
    व्हिडिओच्या सुरवातीस आपल्या पथकाचे नाव व त्या दिवशीची तारीख सांगून मग वादनाला सुरवात करावी. (तारीख नसलेले व्हिडिओ अपलोड केले जाणार नाहीत) 
    चाळीस ढोल व दहा ताशे यांची मर्यादा असावी.
    (झांज-टिपरी-ध्वज यांच्या संख्येला मर्यादा राहणार नाही)  
    ही स्पर्धा केवळ पुणे शहरात सराव करणाऱ्या पथकांसाठीच मर्यादित आहे  
    २८ ऑगस्टला सायंकाळी सहानंतर व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत  

संपर्क - मो. ९८८१०९९००५, ९७६५३१८२८७


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extending the Sakal-Dhol-Tasha competition till tomorrow