Pune University : अधिष्ठाता पदाच्या अर्जाला मुदतवाढ

अधिष्ठाता पदासाठी अर्ज करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे.
Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune Universitysakal

पुणे - अधिष्ठाता पदासाठी अर्ज करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिष्ठाता पदासाठी पुर्वी १८ ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. त्यासाठी सात दिवस बाकी असताना विद्यापीठ प्रशासनाने मुदतवाढ दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उमेदवारांना आता २८ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंच्या निवडी आधीच अधिष्ठाता पदांची निवड होऊ नये, यासाठी ही मुदतवाढ दिल्याची चर्चा आता विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत प्र-कुलगुरू पदाची निवड जाहीर होण्याची शक्यता आहे.

सध्या विज्ञान व तंत्रज्ञान, आंतरविद्याशाखीय अभ्यास, मानव्यविज्ञानसाठी आणि वाणिज्य व व्यवस्थापन या चार विद्याशाखांच्या अधिष्ठाता पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी इच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आतापर्यंत ५० हून अधिक अर्ज आले असून सर्वाधिक अर्ज विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी आहेत.

त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती. ही मुदत संपण्यास अजूनही सात दिवस बाकी आहेत. पण त्याआधीच विद्यापीठ प्रशासनाने घाईने मुदतवाढ दिल्याचे पत्रिपत्रक काढले आहे. त्यानुसार ऑनलाइन अर्ज २८ ऑगस्टपर्यंत करता येणार आहेत. तर प्रत्यक्ष ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com