'एक्‍सप्रेस-वे'वरील टोल 2035 पर्यंत 

महेंद्र बडदे 
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नागपूर : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल वसुलीसाठी संबंधित कंत्राटदाराला 2035 पर्यंत मुदतवाढ देणार असल्याची माहिती पुढे आली आहे. विधान परिषदेत तारांकित प्रश्‍नाला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे लेखी उत्तर दिले आहे. 

'या द्रुतगती मार्गासाठी आतापर्यंत 2478.61 कोटी रुपये खर्च झाला आहे. प्रकल्पाची किंमत आणि त्यावरील व्याज, देखभाल दुरुस्तीचा खर्च, इतर प्रशासकीय खर्च हा पथकर वसुलीतून जमा होणे अपेक्षित आहे. सध्याच्या उद्योजकाच्या पथकर वसुलीचा कालावधी 8 ऑगस्ट, 2019 रोजी संपत आहे. आतापर्यंत येथे 5318.42 कोटी रुपये टोल वसुली झाली आहे,' असे यात म्हटले आहे. 

द्रुतगती मार्गाच्या क्षमतावाढीच्या प्रकल्पासाठी सुमारे 3215 कोटी रुपये इतका खर्च आहे. त्यामुळे या मार्गावरील टोल वसुलीचा कालावधी 2035 पर्यंत वाढविण्यात आला आहे, असेही त्यात म्हटले आहे. हा मार्ग आठ पदरी करण्यात येणार असल्याचे कारण देत टोलवसुलीची मुदत वाढविली गेल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. 

आमदार संजय दत्त, शरद रणपिसे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्‍न विधान परिषदेत उपस्थित केला होता. 

Web Title: Extension for toll on Mumbai Pune Express way till 2035