दिवाळी सुटीत प्रवाशांसाठी एसटी सज्ज; 1250 गाड्या धावणार 

extra ST are available for Diwali
extra ST are available for Diwali

पुणे : दिवाळीनिमित्त शहरातून गावी जाण्याची लगबग सुरू आहे. शनिवार, रविवारबरोबर सोमवारी मतदानाची सुटी होती. त्यामुळे परगावी जाणाऱ्यांची संख्या वाढली. पर्यायाने शहरातील एसटी स्थानके 'हाउसफुल्ल' झाली होती. शहरातून विदर्भ, मराठवाड्यात जाणाऱ्या बहुतांश गाड्यांचे आरक्षणही 'फुल्ल' झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर एसटी प्रशासनाने 23 ते 26 ऑक्‍टोबरदरम्यान शहरातील बस स्थानकांमधून नियोजित बसव्यतिरिक्त सुमारे 1250 जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

शहरातून दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना सुखरूप गावी जाता यावे. यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर, नवीन शिवाजीनगर (वाकडेवाडी) आणि पिंपरी-चिंचवड बस स्थानकातून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात जाणाऱ्यांसाठी या गाड्यांचे आगाऊ आरक्षणाची सोय केली आहे. मात्र बहुतांश आरक्षण 'फुल्ल' झाले आहे. गरजेनुसार गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली. 

दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा गाड्या सोडण्याच्या निर्णय घेतला. 
- यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com