फेसबुकवरील मैत्री पडली 80 हजारांना ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

पुणे - फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी झालेल्या मैत्रीची किंमत एका तरुणीला 80 हजार रुपयांना चुकवावी लागली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा मंगळवारी दाखल झाला. 

पुणे - फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी झालेल्या मैत्रीची किंमत एका तरुणीला 80 हजार रुपयांना चुकवावी लागली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा मंगळवारी दाखल झाला. 

वानवडीतील एका 26 वर्षांच्या युवतीला फेब्रुवारीत एका अनोळखी व्यक्तीची फेसबुकवर फ्रेंड रिक्‍वेस्ट आली. तिने ती ऍक्‍सेप्ट केली. त्यानंतर त्या युवतीचा वाढदिवस होता. तेव्हा परदेशातील महागडे गिफ्ट पाठविले आहे, असे त्या व्यक्तीने सांगितले. मात्र, गिफ्टचे पार्सल सोडवून घेण्यासाठी काही पैसे बॅंकेत भरावे लागेल, असे तिला सांगितले. त्यानुसार युवतीने पैसे भरले. परंतु, त्यानंतर पुन्हा त्याने संपर्क साधून आणखी पैसे भरण्यास सांगितले. या पद्धतीने एक महिन्यात त्या युवतीला 80 हजार रुपये भरावे लागले. त्यानंतरही तिला पुन्हा एक लाख रुपये भरण्यास सांगितले. परंतु, तेव्हा तिला शंका आली. त्यामुळे तिने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात चोरटा आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत वानवडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रावसाहेब भापकर म्हणाले, ""संबंधित युवतीने ज्या बॅंकेत पैसे भरले आहेत, तेथील तपशील मिळवून चोरट्यांचा तपास सुरू आहे.'' 

Web Title: facebook friendship cheating

टॅग्स