हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत शुभम बनला महसूल सहाय्यक

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या महसूल सहाय्यक पदासाठी 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांने घवघवीत यश मिळवले.
pune
punesakal

पसुरे (ता. भोर) : येथील शुभम शिवाजी धानवले यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या महसूल सहाय्यक पदासाठी 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांने घवघवीत यश मिळवले.

शुभमचे प्राथमिक व दहावी पर्यंतचे शिक्षण पसुरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व पसूरे हायस्कूल येथे झाले. अकरावी बारावी सायन्स मधून राजा रघुनाथराव विद्यालय भोर येथे पुर्ण केली. त्यानंतर भोरमधील अनंतराव थोपटे महाविद्यालयात इंग्रजी विषयात बी.ए. केले. हे शिक्षण घेत असताना भोर येथे मित्रांसोबत रुम घेऊन राहू लागला. यावेळी भोर मधील ध्येय व संकल्प प्रतिष्ठान या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करु लागला. पहाटे व वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करुन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या महसूल सहाय्यक परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या आईची मुलासाठीची असनारी धरपड सार्थ करून दाखवली.

शुभम याची घरची परिस्थीती हालाखीची आहे. तुटपुंजी शेती आणि पशूपालन करुन धानवले कुटुंब आपली उपजीवीका भागवत असताना २०१९ मध्ये शुभमचे वडील शिवाजी तुकाराम धानवले यांचे आजारपणाने निधन झाले. वडीलांच्या निधनानंतर शुभमची आई सरुबाई हिने आपली असलेली शेती व पशूपालन करत शुभमचा शिक्षणाचा खर्च भागवू लागली. स्वतः काबाडकष्ट करत गावातच रतीबाचे दुध घालून त्यातून मिळणार्या पैशातून शुभमला शिकवताना कोणतीही कसर ठेवली नाही.

अवघ्या दुसरी पर्यंत शिकलेल्या आईने आपल्या मुलाने शिकून मोठ व्हावे व मुलाला घडवण्यासाठी केलेले कष्ट शुभमने अनुभवले होते. त्यातूनच आपल्या आईच्या कष्टाचे चीज करण्यासाठी शुभमने जिद्दीने चिकाटीने खडतर परिस्थितीत रात्रंदिवस अभ्यास करुन हे यश संपादन केले आहे.

मित्र, पुस्तक, रस्ता आणि विचार योग्य असतील तर आयुष्य सुंदर होते असे म्हणत शुभमने त्याच्या यशात त्याचे चुलते रामचंद्र धानवले तसेच मित्र दिगंबर खोपडे, सचिन चिकने, अमोल खोपडे सागर खंडाळे, किरण धनावडे, गजानन थोपटे व अमित दिघे यांचाही सहभाग असल्याचे सांगितले. या यशानंतर ढोल ताशाच्या गजरात गावकर्यांनी शुभमचे स्वागत करत कौतुक केले. तसेच धेय्य अभ्यासिकेच्या संस्थापिका पौर्णिमा जावीर, स्वप्नील जावीर यांनी शुभमचा सत्कार केला.

"शिक्षण घेत असताना आपल्या आई वडीलांनी आपल्याला घडवण्यासाठी घेतलेले काबाडकष्ट डोळ्यांपुढे ठेवून तसेच चांगल्या मित्रांची संगत धरली तर यश नक्की मिळते. यश मिळाल्यावर वडीलांची आठवण आली. वडीलांचे छत्र हरविले असतानाही मला या यशापर्यंत नेहण्यात माझ्या आईचे मोल अनमोल आहेत."

-बातमीदार - महुडे भोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com