जम्मू-काश्‍मीरमध्ये गुंतवणूकदारांसाठी सुविधा

dr-sagar-doiphode
dr-sagar-doiphode

पुणे - कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्‍मीरमध्ये गुंतवणूक करण्यास अनेक जण इच्छुक आहेत. त्यासाठी आवश्‍यक असणारी लॅंड बॅंक तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. गुंतवणूकदारांना आवश्‍यक पायाभूत सुविधा सध्या उभारण्यात येत असल्याची माहिती काश्‍मीरमधील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांनी सोमवारी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. शिक्षण, सेवा आणि शेती या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यास अनेक जण इच्छुक असल्याचे दिसते. याबाबत त्यांच्याकडून प्राथमिक चौकशीदेखील करण्यात आली आहे. काश्‍मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी जमीन आहे. तिची लॅंड बॅंक करून ती गुंतवणूकदारांना देता येऊ शकते. तेथील पर्यटन क्षेत्र चांगल्या प्रकारे विकसित झाले आहे. मात्र, शेती व्यवसाय अजून चांगल्याप्रकारे विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिकांना प्रवृत्त करण्यात येत आहे.

तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येथे काही बंधने ठेवण्यात आली होती. मात्र, सामान्यांच्या अधिकारांवर गदा येणार नाही, याची काळजीदेखील घेण्यात आली असल्याचे डॉ. डोईफोडे यांनी सांगितले.

स्थानिकांनी बदल स्वीकारलाय
सध्या काश्‍मीरमध्ये शांतता आहे. कोठेही सैन्याच्या वापर करावा लागल्याची घटना एवढ्यात घडली नाही. स्थानिकांनी कलम ३७० रद्द करण्याचा बदल स्वीकारला आहे. तेथील रहिवाशांमध्ये गुंतवणुकीबाबत विश्‍वास निर्माण झाला आहे, असे डॉ. डोईफोडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com