विद्यार्थी आणि पालकांनो, अॅडमिशनसाठी दाखले काढायचे आहेत? आता करा ऑनलाईन अर्ज!

Students_Admission
Students_Admission

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महा-ई सेवा केंद्र आणि सेतू केंद्रामधून दाखले घेण्याऐवजी विद्यार्थी आणि पालकांसाठी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. http://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.

अर्ज करतेवेळी किंवा संकेतस्थळाला काही अडचण असल्यास नागरी सुविधा केंद्र, पुणे शहर या केंद्राच्या gil702248@gmail.com आणि tahasildarpunecity@gmail.com या ई-मेलवर कागदपत्रे पाठवावीत, असे आवाहन पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते- पाटील यांनी केले आहे.

पुणे शहर तहसील कार्यालय अंतर्गत कार्यक्षेत्र : 
पुणे शहर, पर्वती, एरंडवणा, शिवाजीनगर, औंध, बोपोडी, येरवडा, मुंढवा, घोरपडी, वानवडी आणि पुणे शहरातील सर्व पेठा या कार्यालयांतर्गत येतात.

या परिसरातील विद्यार्थ्यांना प्रामुख्याने उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वय-राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक असतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे : 

1. उत्पन्नाचे प्रमाणपत्र :
स्वघोषणापत्र, एक फोटो, वीज बिल/ कर पावती, रेशनकार्ड आणि आर्थिक वर्ष 2019-20 चे आयटीआर/ फॉर्म-16/ तलाठी यांचा चौकशी अहवाल 

2. वय, राष्ट्रीयत्व अधिवास दाखला :
स्वघोषणापत्र, एक फोटो, दहा वर्षांचा रहिवासी पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला तसेच वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड/आधारकार्ड

3. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकासाठी प्रमाणपत्र :
स्वघोषणापत्र, एक फोटो, उत्पन्नाचे स्वघोषणापत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र 1967 पासून महाराष्ट्रातील वास्तव्याचे पुरावे लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, वीज बील / कर पावती/ रेशनकार्ड/आधारकार्ड 

4. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र : 
स्वघोषणापत्र, एक फोटो, लाभार्थीचे जात प्रमाणपत्र, लाभार्थी आणि वडील यांचा शाळा सोडल्याचा दाखला, तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वीज बील / रेशनकार्ड/ आधारकार्ड.

5. जातीचा दाखला : ओबीसी /एईबीसी (मराठा) : 
स्वघोषणापत्र, एक फोटो, लाभार्थी किंवा वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, वीज बिल/आधार कार्ड, 1967 च्या पूर्वीचा पुणे शहरातील जात नमूद असल्याचा पुरावा.

6. जातीचा दाखला : अनुसूचित जाती, जमाती : 
स्वघोषणापत्र, एक फोटो, लाभार्थी किंवा वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, वीज बिल/आधार कार्ड, 1950 च्या पूर्वीचा पुणे शहरातील जात नमूद असल्याचा पुरावा.

7. जातीचा दाखला : भटक्या विमुक्त जमाती : 
स्वघोषणापत्र, एक फोटो, लाभार्थी किंवा वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, वीज बिल/आधार कार्ड, 1961 च्या पूर्वीचा पुणे शहरातील जात नमूद असल्याचा पुरावा.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा पुढील क्रमांकावर :
9657759988
7218851578 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊन कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र वगळता  महा-ई सेवा केंद्र, सेतू सुरू राहतील. परंतु कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता विद्यार्थी आणि पालकांनी ऑनलाईन अर्ज करण्यास प्राधान्य द्यावे.
- तृप्ती कोलते-पाटील, पुणे शहर तहसीलदार

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com