esakal | 'राजभवनात कोरोना, अमिताभजींना कोरोना' असं म्हणत सामंतांनी UGCला लावला टोला!
sakal

बोलून बातमी शोधा

Uday_Samant

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवास्थान असलेल्या 'राजभवनात' कोरोना घुसला आहे. राज्यपाल कोश्यारी सुरक्षित असले तरी तेथील कर्मचाऱ्यांना लागन झाल्याने खळबळ उडाली आहे.

'राजभवनात कोरोना, अमिताभजींना कोरोना' असं म्हणत सामंतांनी UGCला लावला टोला!

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले. त्यात आता राजभवनापर्यंत कोरोना गेल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 'परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आहे, आता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडणार का?" अशा शब्दांत सामंत यांनी टीका केली आहे.

ग्राहकांनो, वीजबिल ऑनलाइन माध्यमांद्वारे भरा; महावितरणने का केलं असं आवाहन?​

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सप्टेंबर अखेरीपर्यंत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन किंवा मिश्र पद्धतीने घ्याव्यात, असे आदेश दिले आहेत. मात्र महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती पाहता परीक्षा घेणे शक्य नाही. विद्यार्थ्यांना करावा लागणार प्रवास, राहण्याची व्यवस्था, भोजन या सर्वांचा विचार करावा लागेल. परीक्षेसाठी विद्यार्थी एकत्र येणार असल्याने त्यात कोरोनाची लागन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा परीक्षा न घेता, पूर्वीच्या वर्षाच्या गुणांवरून सरासरी गुण देऊन पदवी द्यावी.

अरे देवा! लाॅकडाऊन उठला पुणेकरांच्या मुळावर; जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडवले​

तसेच जे परीक्षा देण्यासाठी इच्छुक आहेत त्यांची व्यवस्था केली जावी, असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, त्यानंतर यूजीसीने परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यास राज्य सरकारने विरोध केला असला तरी विद्यापीठांना परीक्षा घ्याव्या लागतील, हे निर्देश बंधनकारक असल्याची प्रतिक्रिया 'यूजीसी'चे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिली होती. 

पुण्यात अजित पवारांनी लॉकडाऊन केलं अन् रोहित पवार म्हणतात...

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवास्थान असलेल्या 'राजभवनात' कोरोना घुसला आहे. राज्यपाल कोश्यारी सुरक्षित असले तरी तेथील कर्मचाऱ्यांना लागन झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन या दोघांनाही कोरोना झाला आहे. याचा संदर्भ घेऊन उदय सामंत यांनी यूजीसी आणि भूषण पटवर्धन यांच्यावर टीका केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"राजभवनात कोरोना... अमिताभजींना कोरोना... अशा सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी एचआरडी आणि यूजीसी ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का?" असे ट्विट करत त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image