Ashadhi wari 2022 : बा... विठ्ठला भिजव रे माझं रान रे...

प्रती पंढरपूर विठ्ठलवाडी येथे आज वैष्णवांचा मेळा जमला
Fair of Warkari gathered at Pandharpur Vitthalwadi
Fair of Warkari gathered at Pandharpur Vitthalwadi

सिंहगड रस्ता - प्रती पंढरपूर विठ्ठलवाडी येथे आज वैष्णवांचा मेळा जमला. विठूनामाचा गजर झाला. पाऊस पडू दे, धनधान्य फळू दे, सगळीकडे आरोग्य नांदू दे, सगळीकडे समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना भक्तांनी करत विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलवाडी येथे भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. विठ्ठल-रखुमाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार कुमार गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार गोसावी कुटुंबाकडून पहिली पूजा करण्यात आली.

यावेळी धनंजय गोसावी आणि ऐश्वर्या गोसावी यांच्या हस्ते महापूजा झाली. पहाटे साडेचार वाजता महाआरती झाली आणि त्यानंतर पाच वाजता दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. सकाळपासूनच नागरिकांचा दर्शनासाठी ओढा बघायला मिळाला. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात सण-उत्सव साजरे करता आले नाही; मात्र यंदा नागरिकांनी दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्या.

याठिकाणी विविध संस्थांनी आपली सेवा रुजू केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने भाविकांच्या पादत्राणांची साठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कै. सतीश धोंडिबा मिसाळ यांच्यावतीने अकरा हजार किलो खिचडीचे वाटप करण्यात आले. सिंहगड नाभिक विकास मंडळाच्यावतीने भाविकांना राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले. शांती निकेतन सेवा प्रतिष्ठान आणि श्री स्वामी बॅग यांच्यावतीने एकवीस हजार तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. शशितारा प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक श्रीकांत जगताप यांच्या वतीने भाविकांसाठी मोफत रिक्षेने वाहतूक आयोजित केली होती.

माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या वतीने विशेष फराळाचे आयोजन केले होते तर माजी नगरसेविका ज्योती गोसावी यांच्यावतीने देखील फराळचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्यावतीने आरोग्य विभागाचे सुमारे शंभर कर्मचारी कार्यरत होते. सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 250 पोलीस बंदोबस्ता साठी तैनात होते.

याशिवाय विविध सामाजिक संस्थांच्यावतीने भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सिंहगड रस्ता, हिंगणे, वडगाव, तसेच धायरी, नऱ्हे, आंबेगाव, खडकवासला, डोणजे, गोऱ्हे बुद्रुक पंचक्रोशीतील भाविकांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com