

Pune Fraud Case Fake Godman and Disciple Cheat Engineer of 14 Crores Selling His UK House and Flats
Esakal
पुण्यात अंधश्रद्धेतून एका इंजिनिअरची तब्बल १४ कोटींची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलंय. शंकर महाराज अंगात येतात असं सांगून तुमच्या सर्व अडचणी दूर होतील असं सांगत इंजिनिअरला लुबाडण्यात आलं. या प्रकरणी तथाकथिक गुरु आणि त्यांच्या शिष्येविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबाने भोंदूबाबाला पैसे देण्यासाठी इंग्लंडमधलं फार्महाऊस आणि पुण्यातली संपत्तीही विकली.