सायबर विभागाच्या पोलिस अधिकाऱयालाच बनावट 'कॉल'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

नमस्कार, तुम्हाला 12 लाख रुपयांची मोटार 'गिफ्ट' लागली आहे. तुम्हाला मोटार हवी की पैसे, असे विचारून काही कागदपत्रांसह पैसे पाठविण्याबात एका भामट्याने सायबर क्राईम विभागातील पोलिस निरीक्षकालाच फोन केला. पण, शेवटी पोलिस अधिकाऱयाने आपली खरी ओळख सांगितल्यानंतर तो गडबडला आणि फोन बंद केला.

पुणे: नमस्कार, तुम्हाला 12 लाख रुपयांची मोटार 'गिफ्ट' लागली आहे. तुम्हाला मोटार हवी की पैसे, असे विचारून काही कागदपत्रांसह पैसे पाठविण्याबात एका भामट्याने सायबर क्राईम विभागातील पोलिस निरीक्षकालाच फोन केला. पण, शेवटी पोलिस अधिकाऱयाने आपली खरी ओळख सांगितल्यानंतर तो गडबडला आणि फोन बंद केला.

#CyberCrime सायबर गुन्हेगारांकडून ग्राहकांना लाखोंचा गंडा

शिवाजीनगर येथील सायबर पोलिस स्टेशनमधील पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे यांना एकाने फोन केला. तुम्ही वस्तू खरेदी केल्यामुळे कंपनीकडून तुम्हाला बक्षिस म्हणून 12 लाख रुपयांची मोटार देण्यात येणार आहे. मोटार अथवा मोटारीच्या किंमतीएवढे पैसे मिळू शकतात. यासाठी आधारकार्ड, बॅंकेचे डिटेल्स आलेल्या मोबाईलच्या व्हॉट्सऍप क्रमांकाच्या पाठवण्यास सांगू लागला. काही वेळानंतर बक्षिस हवे असल्यास काही रक्कम खात्यात जमा करण्यासाठी सांगून गोड बोलू लागला. रायगड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचेही सांगत होता. पण, त्याला रायगड जिल्ह्यातील गावाचे नाव सांगता येत नव्हते. घावटे यांनी त्याच्याकडून सर्व माहिती हळूहळू काढून घेतली. शेवटी, सायबर विभागात पोलिस अधिकारी असल्याचे सांगितल्यानंतर तो गडबडला आणि लगेचच फोन बंद केला.

#CyberCrime एटीएम सांभाळा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राइमचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळ्या प्रकारे बक्षिस मिळाल्याचे सांगून बँकेची माहिती घेतात व एकदा बँकेचे डिटेल्स मिळाले की खात्यामधील रक्कम हडप करतात. ज्येष्ठ नागरिकांसह, महिला व मोठ-मोठ्या व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे, यामुळे गिफ्ट कॉलवर विश्वास न ठेवता यापासून सावध राहा, असे आवाहन श्री. घावटे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake call to cyber crime police inspector in pune