अनामत रक्कम म्हणून दिले तीन कोटीच्या मुदत ठेवीचे बनावट प्रमाणपत्र

Fake certificate of term deposit of Rs 3 crore given as security deposit
Fake certificate of term deposit of Rs 3 crore given as security deposit
Updated on

पुणे : विविध कामांच्या 24 निविदा सर्वांत कमी दराने भरून ठेकेदाराने कंत्राट प्राप्त केले. संबंधित कामांची सुरवात करण्यासाठीचे आदेश मिळविण्यासाठी सुरक्षा अनामत रकमेच्या मूल्याचे मुदत ठेवींचे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा केले. मात्र ते प्रमाणपत्रच बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर विभागाने ठेकेदाराविरोधात तक्रार दिली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या भामट्या ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन कोटी 87 लाख 11 हजार रुपयांची बनावट मुदत ठेवीचे प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली आहे. सोपान जर्नादन घोडके (वय 37, रा.कोथरूड) असे या ठेकेदाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडके हा नोंदणीकृत ठेकेदार आहे. त्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निघालेल्या निविदांपैकी 24 निविदा सर्वाधिक कमी रकमेच्या भरून कंत्राट मिळवले होते. या कामाचा कार्यारंभ आदेश मिळविण्यासाठी सुरक्षा अनामत रकमेच्या मूल्याचे दोन कोटी 87 लाख 11 हजार रुपये किमतीच्या बनावट मुदत ठेवींचे प्रमाणपत्र तयार करून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा केले होते. ही घटना 2018 ते मार्च 2020 दरम्यान घडली. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे? खोटे प्रमाणपत्र कसे तयार केले याचा बंडगार्डन पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com