esakal | राज्यपालांच्या सहीचे बनावट पत्र सोशलमीडियावर पत्र व्हायरल | Pimpri
sakal

बोलून बातमी शोधा

 राज्यपालांच्या सहीचे बनावट पत्र

Pimpri : राज्यपालांच्या सहीचे बनावट पत्र सोशल मीडियावर पत्र व्हायरल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : एका सामाजिक कार्यकर्त्याची विधान परिषदेवर निवड झाल्याबाबतचे राज्यपालांच्या सहीचे तयार केले बनावट पत्र तयार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच हे पत्र सोशलमीडियावर व्हायरल केले. प्रमोद ठोंबरे (वय २५, रा,वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा: "भाजपचं ईडीमध्ये जसं अस्तित्व दिसतं तसं कश्मीर खोऱ्यात दिसावं"

याप्रकरणी अजीज नवाब शेख (रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादीकडे चालक म्हणून कामाला होता. दरम्यान, त्याने राज्यपाल यांच्या खोट्या सहीचे पत्र व त्यामध्ये फिर्यादी यांची विधान परिषदेवर निवड झाल्याचे नमूद केले. तसेच हे बनावट पत्र फिर्यादीसह त्यांच्या भावाच्या व्हाट्सअपवर पाठवले. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top