Daund Crime : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी पोलिस शिपायाविरूध्द गुन्हा

राज्य राखीव पोलिस दलातील सशस्त्र पोलिस भरतीसाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर करून ओबीसी खेळाडू प्रवर्गातून भरती झालेल्या वर्धा येथील एका नवप्रविष्ठ पोलिस शिपायाविरूध्द दौंड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
fake sports certificate for police recruitment fraud case against constable
fake sports certificate for police recruitment fraud case against constableesakal

दौंड : राज्य राखीव पोलिस दलातील सशस्त्र पोलिस भरतीसाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर करून ओबीसी खेळाडू प्रवर्गातून भरती झालेल्या वर्धा येथील एका नवप्रविष्ठ पोलिस शिपायाविरूध्द दौंड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेपक टकराव या क्रीडा प्रकाराचे बनावट प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते.

दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. नवप्रविष्ठ पोलिस शिपाई सुशील केशवराव वाघमारे (वय ३३, रा. पंजाब कॅालनी, तडस ले - आउट, वर्धा) असे त्या संशयिताचे नाव आहे. सुशील वाघमारे याला भरती दरम्यान मैदानी परीक्षेत ८७ तर लेखी परीक्षेत ७३ गुण मिळाल्याने त्याचे निवड यादीत नाव आले होते.

ओबीसी खेळाडू प्रवर्गातून भरती होताना सुशील वाघमारे याने २ आॅगस्ट २०२३ रोजी सेपक टकराव या खेळाचे अवैध प्रमाणपत्र सादर केले होते. तसेच बालेवाडी (पुणे) येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय कार्यालयाच्या नावाने या खेळासंबंधी बनावट पुनर्पडताळणी अहवाल,

लेटरहेड, शिक्के तयार करून तसेच बनावट स्वाक्षरी करून कागदपत्रे सादर केले होते. या बनावट प्रमाणपत्रांविषयी भरती साठी आलेल्या एका उमेदवाराने राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचचे समादेशक यांच्याकडे तक्रार केली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर सदर प्रमाणपत्रांची व कागदपत्रांची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार २७ जानेवारी रोजी दौंड येथील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचचे सहायक समादेशक सुनील सरोदे यांनी या बाबत दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार सुशील वाघमारे याच्याविरूध्द फसवणूक करणे, बनावट दस्ताएेवज तयार करणे, व्यक्तीच्या लौकिकास बाधा आणणे, बनावट शिक्का, मुद्रापट व अन्य साधनांचा वापर करून ते जवळ बाळगल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक अरविंद गटकूळ या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.

काय आहे सेपक टकराव...

सेपक या मलेशियन शब्दाचा अर्थ किक मारणे आणि टकराव या थाई भाषेतील शब्दाचा अर्थ म्हणजे शिवलेला बॅाल. हा खेळ फुटबॉल , बॅडमिंटन व व्हॉलिबॉल या तीन क्रीडा प्रकारांची संमिश्र आवृत्ती आहे.

या खेळात व्हॉलीबॉल प्रमाणेच मध्ये नेट असते. मात्र बॉल हाताने मारता येत नाही तर तुम्हाला पायांचा वापर करून बॉल नेटच्या पलीकडे मारावा लागतो. पॉइंट्स देण्याची पद्धत ही व्हॉलीबॉल सारखीच असते. आशियाई क्रीडा स्पर्धेत याचा १९९० मध्ये समावेश करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com