खडकीतील कुटुंबे स्वगृही परतली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

पुणे : पवना धरणातून सोमवारी (ता. 5) रात्रीपासून पाण्याचा विसर्ग काही अंशी कमी झाल्यामुळे  खडकीतील नदीकिनारी असलेल्या रहिवाशांना थोडा दिलासा मिळाला. मुळा नदीचे पाणी काही  प्रमाणात ओसरू लागल्याने पाण्याखाली गेलेल्या वस्तीमधील कुटुंबे पुन्हा आपल्या घराकडे वळू लागलr आहेत.

खडकी बाजार येथील महादेव  वाडी येथील काही घरे नदीच्या प्रवाहाचे पाणी घरात शिरल्यामुळे बेघर झाले होते. त्यांना खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्नल भगत शाळेत हलवण्यात आले होते. मंगळवारी सकाळपासून नदीपत्रातील पाणी ओसरू लागले आहे. गाडीअड्डा येथील मैदानापर्यंत आलेले पाणी आता नदीपात्रातून वाहत असल्यामुळे  घरातील कर्ते मंडळी आपापल्या घरांची पाहणी करण्याकरिता घराकडे वळत आहेत. मात्र अजूनही काही घरांमध्ये पाणी असल्यामुळे परिस्तिथी पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
होळकर पूल, वॉर सिमेंट्री ,आदर्श नगर मुळा रोड, येथे काही प्रमाणात नदीपात्रातून बाहेर वाहणारे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: families returned home in khadki