पुणे : नामवंत सराफी व्यावसायिक मिलिंद मराठे यांचे निधन

Marathi news about Milind Marathe
Marathi news about Milind Marathe

पुणे : शहरातील एक नामांकित सराफी व्यावसायिक मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे (वय 60) यांचे रविवारी (ता.27) पहाटे निधन झाले. त्यांनी 16 डिसेंबर रोजी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

हृदयाची क्रिया बंद पडल्याने आज पहाटे साडेतीनच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. मराठे हे शहरातील नामांकित 'मराठे ज्वेलर्स'चे मालक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते आर्थिक अडचणीत सापडले होते.

लॉकडाऊन काळात त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली होती. त्यामुळे ते आर्थिक तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली. आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या दिवशी मराठे हे नेहमीप्रमाणे दिवसभर लक्ष्मी रस्त्यावरील त्यांच्या दुकानामध्ये होते. दरम्यान, सायंकाळी साडे सात वाजता त्यांनी दुकानातच पिस्तुलातून छातीवर गोळी झाडली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांच्या दुकानातील कामगारांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

मराठे यांच्या निधनाची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यापासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक अडचणीत होते. लॉकडाऊन काळात कर्ज आणखी वाढले होते. त्यांचे एक दुकान बॅंकेने सील केले होते. त्यामुळे ते आर्थिक तणावाखाली होते.
- विजय तिकोळे, पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे

ही घटना आम्हाला मोठा धक्का देणारी आहे. जवळची व्यक्ती आता आमच्यात नाही हे खूप वेदनादायी आहे. रविवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- अक्षय गाडगीळ, मराठे यांचे आत्ये भाऊ

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com