

Fake Staff Records Cost College Dear; Farate Patil Institution Penalized ₹1 Crore
sakal
मांडवगण फराटा : येथील फराटे पाटील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयावर भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने (NCISM) तब्बल एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. महाविद्यालयाने मान्यता मिळविण्यासाठी अशैक्षणिक व रुग्णालयीन कर्मचारी केवळ कागदोपत्री दाखवून खोटी व दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे.