esakal | पुण्यात बळीराजाच्या डोळ्यासमोर धान्य आणि चारा आगीत खाक

बोलून बातमी शोधा

farm fire}

डोळ्यांसमोर कष्ट करून पिकविलेली पाच पोते ज्वारी व जनावरांचा चारा जळून खाक झाला. शेतकरी आग विझविण्यासाठी धावले,परंतु ते काही करू शकले नाहीत.

pune
पुण्यात बळीराजाच्या डोळ्यासमोर धान्य आणि चारा आगीत खाक
sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी - खडकवासला इथं गुरुवार दि. 4 मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक सचिन मते यांच्या शेतात आग लागली. उन्हाचा कडाका व वाऱ्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये मते व त्यांच्या आजुबाजुला असणारे शेतकरी आग विझविण्यासाठी धावले,परंतु ते काही करू शकले नाहीत. शेतकरी सचिन मते यांच्या डोळ्यांसमोर कष्ट करून पिकविलेली पाच पोते ज्वारी व जनावरांचा चारा जळून खाक झाला.

खडकवासला येथील शेतकरी सचिन विलास मते यांच्या शेतातील एक हजार गवताच्या, चारशे भाताच्या व तीनशे पन्नास कडब्याच्या पेंढ्या, पाच पोती ज्वारी व सहा आंब्याची झाडे जळून खाक झाली आहेत. यामध्ये सचिन मते या शेतकऱ्याचे अंदाजे पन्नास हजारांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

"कुणीतरी खोडसाळपणे आग लावलेली आहे. जनावरांसाठी ठेवलेला पूर्ण चारा जळून गेला आहे.पाच पोती ज्वारी जळाली आहे.पोलीस तपास करण्याऐवजी आम्हालाच आग कोणी लावली त्याचे नाव सांगण्यास सांगत आहेत."
सचिन विलास मते, नुकसानग्रस्त शेतकरी

हे वाचा - दौंड : देवकरवाडीत 'साई ट्रेज' कंपनीला भीषण आग

दरम्यान, शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेले असताना कृषी विभागाचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी आले नाहीत. सरपंच सौरभ मते यांनी विनंती केल्यानंतर तलाठी धनश्री हिरवे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सचिन मते तक्रार देण्यासाठी हवेली पोलिस ठाण्यात गेले असता त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यात आली नाही. उलट आग कोणी लावली त्याचे नाव सांगा असा प्रतिप्रश्न तेथे असलेल्या पोलीसांनी विचारल्याचे मते यांनी सांगितले. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु संपर्क होऊ शकला नाही.