दौंड : देवकरवाडीत 'साई ट्रेज' कंपनीला भीषण आग

संतोष काळे 
Friday, 5 March 2021

देवकरवाडी (ता. दौंड) येथील 'साई ट्रेज' कंपनीला शुक्रवार (ता. ५) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शॉर्टशर्किमुळे भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राहू : देवकरवाडी (ता. दौंड) येथील 'साई ट्रेज' कंपनीला शुक्रवार (ता. ५) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शॉर्टशर्किमुळे भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागून कापूस तसेच मशिनरी जळून खाक झाल्या आहेत. कंपनीच्या शेजारी लावलेली एक चारचाकी गाडी जळून खाक झाली. यात सुमारे एक कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीचे मालक दिलीपकुमार मारूती पवार यांनी सांगितले.

सोनं खरेदी करण्याचा गोल्डन चान्स ते आमच्या पुण्यात सगळंच भारी; वाचा एका क्लिकवर​

सदर कंपनीमध्ये लहान मुलांच्या हगीजची निर्मिती केली जाते. तसेच कापसापासून मॅटर्निटीचे पॅड तयार केले जातात. आगीने क्षणात रूद्र रूप धारण केल्याने धूर आणि आगीचे लोट परिसरातून नागरिकांना बरेच तास दिसत होते.

दरम्यान, पुणे येथील तीन अग्निशामक दलाचे बंब आणि पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्ह्स्कोबा साखर कारखान्याचे अग्निशामक दलाचे पथक दाखल झाल्याने आग काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या कंपनीमध्ये अनेक महिला व नागरिक कामाला असतात.

तत्परता दाखवत येथील कर्मचाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी आपला पळ काढला. सदर कंपनीला यापुर्वी चारवेळा अशाच प्रकारे आग लागली होती. कंपनीचा विमा (परतावा) मिळण्यासाठी सदर कंपनीला नेमकी अचानक आग लागली कि आग लावण्यात आली. याबाबत मात्र ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

सदर कंपनीत साधारणात: पन्नास कामगार कामाला आहे. कामगाराच्या सुरक्षिततेची कुठलीही सुरक्षितता नाही. यवत पोलिसांनी घटनास्थळी उशिरा धाव घेतली. यवत पोलिसांत फिर्याद देण्य़ाचे काम सुरू आहे. उशिरापर्यंत आगीचे लोट सुरू होते. आग विझवण्याचे काम सुरू आहे. यापुढे कंपनीच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल, असे कंपनीचे मालक दिलीपकुमार पवार यांनी सांगितले.

कंपनीत वीजपंपाचा स्फोटामुळे आग लागली. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. आग विझविण्याचे काम अंतिम टप्यात आहे. कंपनी सुरक्षिततेची काळजी घेवू. -दिलीप देवकर सरपंच, देवकरवाडी (ता. दौंड) 

मोठी बातमी : गजा मारणे आणि साथीदारांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला​

तब्बल चार वेळा आग- देवकरवाडी ग्रापंचायतीच्या हद्दीत गेल्या दहा वर्षांपासून 'साई ट्रेज नावाने कंपनी सुरू आहे. इलेक्ट्रीकची कामे चालू असताना यापूर्वीपण कंपनीला अचानक आग लागली होती. आतापर्यंत कंपनीला तब्बल चार वेळा आग लागली. कंपनीला विमा परतावा मिळण्यासाठी नेमकी आग लागते की लावली जाते.

याबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कंपनीमुळे धुराचे प्रदूषण मोठया प्रमाणात होत आहे. कंपनी स्थलांतरीत करण्याची मागणी गावतील ज्येष्ठ नागरिकांनी केली. कामगारांची सुरक्षितता रामभरोसे असल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A huge fire broke out at sai treas company in devkarwadi