फुले दांपत्याला भारतरत्न मिळावा - पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

निमगाव केतकी - ‘‘युगपुरुष महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना सन्मानपूर्वक भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे,’’ असे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

निमगाव केतकी - ‘‘युगपुरुष महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना सन्मानपूर्वक भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे,’’ असे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील क्रांतिसूर्य प्रतिष्ठानतर्फे बुधवारी महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, उपसभापती देवराज जाधव, नीरा भीमाचे कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव, उद्योजक वसंत मोहोळकर, सावतामाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, नरसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे, माउली बनकर, निवृत्ती गायकवाड, कांतिलाल झगडे, सागर भोसले, शालन भोंग उपस्थित होते.

गोरे म्हणाले, ‘‘फुले दांपत्याने सर्वसामान्य जनतेसाठी संपूर्ण आयुष्य घालविले. प्रचंड संघर्षाचा सामान करत त्यांनी दिलेले योगदान समाज कधी विसरणार नाही. उपसरपंच तुषार जाधव यांनी प्रास्ताविक केले. स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल जाधव, गणेश पिसे, सागर भोंग, राजू जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. सूत्रसंचालन अर्जुन भोंग यांनी केले व आभार संजय राऊत यांनी मानले. कार्यक्रमानंतर फुले यांच्या प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होती. 

Web Title: farmer campaign phule family bharatratna harshwardhan patil