Pune : बारामती तालुक्यात 3745 हेक्टरवरील पिकांचे पावसाने नुकसान

गेल्या काही दिवसात बारामती तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली
Pune
Pune sakal
Summary

गेल्या काही दिवसात बारामती तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली

बारामती : परतीच्या पावसाने बारामती तालुक्यात धुमाकूळ घातला असून या पावसाने तब्बल 3745 हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी दिली.

गेल्या काही दिवसात बारामती तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. जिरायत भागातही अनेकदा एकाच दिवसात 65 मि.मी.हून अधिक पाऊस नोंदविला गेला. एकाच महिन्यात किंवा एकाच आठवड्यात अचानकच पाऊस पडल्याने नुकसानीची तीव्रता अधिक असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.

बारामती तालुक्याची पावसाची सरासरी 389 मि.मी. इतकी आहे, अनेक ठिकाणी या सरासरीच्या तिप्पट पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्यात व आता परतीच्या पावसानेही बारामतीत जोरदार हजेरी लावली.दरम्यान दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीनंतर बारामती तालुक्यात कृषी विभागाने केलेल्या पाहणीत प्राथमिक अंदाजानुसार 3745 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

बारामती तालुक्यात खरीपाचे (उसाचे क्षेत्र पकडून) 27111 हेक्टर तर रब्बीचे 13900 हेक्टर क्षेत्र मका, ज्वारी व सूर्यफूल आदी पिकांखाली आहे. त्या पैकी 3745 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कृषी विभागाने पाणी ओसरु लागले आहे अशा ठिकाणी पंचनामे सुरु केले असून जेथे पाणी आहे तेथे पाणी ओसरल्यानंतर पंचनामे केले जाणार आहेत.

कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार बारामती तालुक्यात कांदा व इतर भाजीपाला 1500, सोयाबिन- 650, ज्वारी- 650, बाजरी- 500, सूर्यफुल 108 चारा पिके 50 तर उसाचे 37 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा प्राथमिक अंदाज असून यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे. अनेक ठिकाणी पाणीच असल्याने अद्याप अंदाज घेणेही काही ठिकाणी अवघड आहे. बारामती- तालुक्यात पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे

मिलिंद संगई, बारामती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com