'तो' शेतकरी म्हशींना शेतात घेऊन गेला अन् जीव गमावून बसला

Farmer dies of electric shock in Mulshi
Farmer dies of electric shock in Mulshi

कोळवण : विजेच्या तारा तुटून खाली पडल्याने शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. घोटवडे (ता.मुळशी) येथील भेगडेवाडी येथे रविवारी(ता.५) संध्याकाळी ही घटना घडली असून शंकर मारुती भेगडे (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

घोटवडे येथील येथील शंकर मारुती भेगडे हे रानात आपल्या म्हशी घेऊन गेले होते. ते आपल्या म्हशी घेऊन शेतावर जात असताना गावाजवळील रस्त्याच्या बाजूस विजेची तुटून पडली होती व त्यातून वीज प्रवाह चालू होता त्याचा धक्का लागून शंकर भेगडे हे जागीच मरण पावले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ तेथे गेले व शंकर भेगडे यांना तत्काळ खाजगी दवाखान्यात घेऊन गेले. तेव्हा डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले. 

मागील आठवड्यातच रिहे येथे एका आदिवासी मुलीचा तुटलेल्या तारेमुळे जीव गमवावा लागला होता. याला जबाबदार महावितरण कंपनी असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी बोलून दाखवली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरणविरोधात नागरिक रोष व्यक्त करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com