esakal | अरे रे, फ्यूज चेक करताना शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

dhame

पावसामुळे रोहित्राजवळील जमीनीचा भाग ओला झाला होता. त्यामुळे ढमे यांना विजेचा झटका बसला असावा. जवळपास कोणीही नसल्याने मदत मिळाली नाही. थोड्या वेळाने इतर शेतकरी तेथे गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

अरे रे, फ्यूज चेक करताना शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर (पुणे) : विद्युत रोहित्राच्या पेटीतील फ्यूज चेक करणे शेतकऱ्याच्या जिवावर बेतल्याची घटना बारामती तालुक्यातील नारोळी येथे घडली. विजेचा तीव्र धक्का बसल्याने अप्पासाहेब सुरेश ढमे (वय ४८) यांचा मृत्यू झाला.

पुण्यात आज पावसाचा इशारा

याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात अशोक जयवंत ढमे यांनी माहिती दिली की, शुक्रवारी (ता. २८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नारोळी गावातील पोमण विद्युत रोहित्राजवळ ही घटना घडली. आपल्या शेतातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे आप्पासाहेब ढमे हे विद्युत रोहित्र जवळ गेले होते. वीज पुरवठा सुरु करण्याचा करण्याचा करण्याचा ते प्रयत्न करीत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पावसामुळे रोहित्राजवळील जमीनीचा भाग ओला झाला होता. त्यामुळे ढमे यांना विजेचा झटका बसला असावा. जवळपास कोणीही नसल्याने मदत मिळाली नाही. थोड्या वेळाने इतर शेतकरी तेथे गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने महावितरण विभागाला कळविले. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.