शेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई द्यावी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

वडगाव मावळ - गरजेच्या वेळी पाऊस न झाल्याने मावळ तालुक्‍यातील भातउत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे व अर्ज भरून घेण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून तालुक्‍यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी केली. 

तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा, सक्तीचा विमा रद्द करावा, पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्यांसाठी नेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. त्या पार्श्‍वभूमीवर नेवाळे यांच्या पुढाकाराने येथील जिल्हा बॅंकेच्या सभागृहात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. कृषी अधिकारी सुधाकर मोरे, इफको टोकियो विमा कंपनीचे मुख्य अधिकारी रमाकांत मांढरे, व्यवस्थापक सचिन तांबे आदींसह बॅंकेचे तालुक्‍यातील विभागीय अधिकारी, वसुली व विकास अधिकारी तसेच सर्व संस्थांचे सचिव उपस्थित होते. 

नेवाळे म्हणाले, ‘‘पीक कर्जाप्रमाणे शेतकऱ्यांकडून सरसकट विमाकपात केली जातो. शेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई मिळाली पाहिजे. कंपनीकडून हेक्‍टरी ४२ हजार शंभर रुपये या प्रमाणे नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे. तालुक्‍यातील क्षेत्र चार हजार २३० हेक्‍टर असून, विमा कंपनीने शंभर टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्यास तालुक्‍यातील तीन हजार ४८७ शेतकऱ्यांना १७ कोटी ८० लाख रुपये रकमेचा लाभ मिळू शकतो.’’

Web Title: Farmer Insurance Arrears balasaheb newale