वैतागलेल्या शेतकऱ्याने पिकात सोडली मेंढरं

दत्ता म्हसकर
शनिवार, 19 मे 2018

जुन्नर - राजाने मारलं..... आणि पावसानं झोडपले तर तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न तालुक्यातील फ्लॉवर पीक घेणाऱ्या पाडळी (कबाडवाडी), पिंपळगाव सिद्धनाथ आदी गावातील शेतकऱ्यांना पडला आहे. अखेर वैतागलेल्या शेतकऱ्याने 
फ्लॉवर पिकात शुक्रवारी मेंढ्या सोडून दिल्या.

जुन्नर - राजाने मारलं..... आणि पावसानं झोडपले तर तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न तालुक्यातील फ्लॉवर पीक घेणाऱ्या पाडळी (कबाडवाडी), पिंपळगाव सिद्धनाथ आदी गावातील शेतकऱ्यांना पडला आहे. अखेर वैतागलेल्या शेतकऱ्याने 
फ्लॉवर पिकात शुक्रवारी मेंढ्या सोडून दिल्या.

कबाडवाडी ता.जुन्नर येथील शेतकरी अशोक पापडे यांनी झुआरी कंपनीच्या ममता जातीच्या फ्लॉवर बियाण्याची ता.2 फेब्रुवारी 2018 रोजी आपल्या शेतात लागवड केली. खताची मात्रा तसेच पाणी वेळच्यावेळी दिले परंतु 85 दिवस झाले तरी फ्लॉवरला गड्डा काही आला नाही. ही बाब झुआरी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितली. पंचायत समितीचे कृषी अधिकारी विजय खेडकर यांना प्रत्यक्ष शेतावर नेऊन पीक परिस्थिती दाखविली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर लेखी तक्रार दिली. तरी कृषी अधिकाऱ्यांनी साधा पंचनामा केला नाही कोणीच दखल घेतली नाही. अखेर शुक्रवारी झालेल्या खरीप हंगामाच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यामुळे अखेर 104 दिवसांनी वैतागलेल्या शेतकऱ्याने फ्लॉवर पिकात शुक्रवारी ता.18 रोजी मेंढ्या सोडून दिल्या.

पिकासाठीचे बी-बियाणे, खते, मजुरी आदींचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. याला खरंतर झुआरी कंपनी जबाबदार आहे, असे पापडे यांचे ठाम मत आहे. तसेच कृषी विभागाने केलेले दुर्लक्ष देखील कारणीभूत आहे. अनेक शेतकरी हे पिक करून अडचणीत आलेले आहेत. 

''सरकारने आम्हाला एकच परवानगी द्यावी की तुम्ही आणि झुआरी कंपनी पाहुन घ्या, मग आम्ही सर्व शेतकरी झुआरी कंपनीकडून नुकसान भरपाई कशी करून घ्यायची ते आमच्या पध्दतीने पाहु. फक्त परवानगी द्यावी अशी मागणी वैतागलेल्या शेतकऱ्यांनी तसेच पाडळीचे ग्रामपंचाय सदस्य अरूण पापडे यांनी केली आहे.
 

Web Title: farmer left the crop with the sheep