'कांदा माझ्या नवऱ्याला विकला आहे, माझा काहीही संबंध नाही, मी तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करीन.

डी. के वळसे पाटील
Tuesday, 22 December 2020

घोडेगाव (ता. आंबेगाव) परिसरातील ११  शेतकऱ्यांकडून एक हजार ५२३ कांद्याच्या पिशव्या खरेदी केल्या. पाच लाख ८३ हजार १२९ रुपये न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरून मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे असलेले कांद्याचे व्यापारी गणेश भगवान शेवाळे व पत्नी शुभांगी गणेश शेवाळे (रा. लांडेवाडी ता. आंबेगाव) यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक, शिवीगाळ, दमदाटी असा गुन्हा घोडेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे परवानाधारक नसलेल्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मंचर - घोडेगाव (ता. आंबेगाव) परिसरातील ११  शेतकऱ्यांकडून एक हजार ५२३ कांद्याच्या पिशव्या खरेदी केल्या. पाच लाख ८३ हजार १२९ रुपये न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरून मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे असलेले कांद्याचे व्यापारी गणेश भगवान शेवाळे व पत्नी शुभांगी गणेश शेवाळे (रा. लांडेवाडी ता. आंबेगाव) यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक, शिवीगाळ, दमदाटी असा गुन्हा घोडेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे परवानाधारक नसलेल्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

यासंदर्भात शेतकरी संतोष विठ्ठल दरेकर (रा. काळेवाडी / दरेकरवाडी, घोडेगाव, ता. आंबेगाव) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शेवाळे हे शेतकऱ्यांचा कांदा शेताच्या बांधावर जाऊन खरेदीचे काम करत होते. त्यांची पत्नी शुभांगी यांच्याबरोबर दरेकर यांची ओळख झाली. त्यानुसार विश्वास संपादन झाल्यामुळे  त्यांच्यासह गोविंद मनाजी भास्कर संदीप चंद्रकांत काळे, दशरथ नामदेव काळे, सुभाष हरिश्चंद्र काळे, वसंत महिपती काळे, रमेश गोविंद काळे, विजय अविनाश शिंदे, मयूर वसंत झोडगे, प्रकाश उमाजी असवले, रोहिदास रामभाऊ गाडे (सर्व रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) अशा एकूण ११ शेतकऱ्यांनी ता. २४ मार्च २०१९ ते २१ डिसेंबर २०२० या कालावधीत वाहतूक व इतर खर्चात बचत होत असल्यामुळे शेवाळे यांना शेतकऱ्यांनी कांदा बराखीतून व शेताच्या बांधावरून कांद्याच्या पिशव्या दिल्या. खरेदी केलेल्या कांदा मालाच्या पावत्या व धनादेशही त्यांनी दिले. पण धनादेश वटले नाहीत. पैसे देण्यास टाळाटाळ केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यामुळे संतोष दरेकर यांनी गणेश शेवाळे यांना फोन केला. त्यांच्या पत्नी शुभांगी यांनी फोन उचलला. त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्या म्हणाल्या 'कांदा माझ्या नवऱ्याला विकला आहे, माझा काहीही संबंध नाही. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा.' त्यानंतर संतोष दरेकर हे थेट मंचर येथील शेवाळे यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी तेथे शुभांगी शेवाळे हजर होत्या. त्या म्हणाल्या 'तुम्ही परत जर येथे पैशाची मागणी करण्यासाठी आला तर, मी तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करीन.' अशी धमकी संतोष दरेकर यांना दिली आहे. असे दरेकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पुढील तपास  सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार करत आहेत.

पुण्यात महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक; अशी टाळा फसवणूक

'मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे अडत्याकडून शेतकऱ्यांना मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. घोडेगाव भागातील कांदा उत्पादकांची फसवणूक केलेला व्यापाऱ्याचा व मंचर बाजार समितीचा काहीही संबंध नाही. शेतकऱ्यांना विक्री केलेल्या शेतीमालाचा खात्रीशीर मोबदला  व योग्य बाजारभाव मिळण्यासाठी बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी शेतीमाल आणावा.”
- देवदत्त निकम सभापती, आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Onion Cheating Crime