Saurabh Dhatunde : भरणेवाडीचा सौरभ झाला लेफ्टनंट...

इंदापूरच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा..
farmer son Saurabh Dhatunde became lieutenant in indian army Indapur
farmer son Saurabh Dhatunde became lieutenant in indian army Indapursakal

वालचंदनगर : येथील शेतकरी कुटुंबातील सौरभ संतोष धातुंडे (वय २३) या युवकाची भारतीय सैन्य दलाच्या लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली असून सौरभच्या नियुक्ती ने इंदापूरच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला. सौरभ धातुंडे यांचे प्राथमिक शिक्षण भरणेवाडी मधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये झाले. यानंतर पुढील बारावीपर्यंत शिक्षण सातरामधील सैनिक स्कूलमध्ये झाल्यानंतर बिहारमधील गयामध्ये ओटीए (ऑफीसर ट्रेनिंग अॅकॅडमी) मध्ये प्रवेश मिळविला. जिद्द व चिकाटीच्या जोरावर ओटीए चे चार वर्षाचे प्रशिक्षण बिहारमधील गया व हैद्राबाद मध्ये पूर्ण झाले. त्याची नुकतीच भारतीय सैन्य दलाच्या लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली आहे. सौरभ याला लहानपणापासूनच पित्याचे छत्र मिळाले नाही.

सौरभची आई सारिका,आजी शकुंतला व आजोबा परशुराम यांनी शेतीमध्ये कष्ट करुन सौरभाला शिकवले. शेतकरी कुटुंबात जन्माला सौरभ खडतर परिश्रम,चिकाटीच्या जोरावर यश मिळविले आहे. सौरभच्या यशाने त्याच्या आई व आजी आजोबांच्या कष्टाचे चीज झाले असून इंदापूर तालुुक्या मधून कौतुक होत आहे. दिक्षांत समारंभाच्या वेळी निर्भय शिंगाडे, श्रेयश धातुंडे उपस्थित होते. आज शुक्रवार (ता.१६) रोजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते सौरभचा सत्कार करण्यात आला.

इंदापूर तालुक्यातील तिसरा लेफ्टनंट...

इंदापूर तालुक्यातून यापूर्वी आर्मीमध्ये अमित काळे व नेव्हीमध्ये अवधूत पांढरे यांची एनडीए मधून आर्मीमध्ये सौरभ धातुंडे यांना लेप्टनंट होण्याचा बहुमान मिळाला असून इंदापूरचे नाव देशपातळीवर चमकत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com