शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू करावी आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारकडे केल्या.

पिंपरी - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू करावी आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारकडे केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचा 18 वर्धापन दिन शनिवारी (ता. 10) खराळवाडीतील पक्ष कार्यालयात साजरा करण्यात आला. त्यानंतर प्राधिकरणातील तहसीलदार कार्यालयात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना बळिराजाची सदन दिली. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक योगेश बहल, हनुमंत गावडे, नाना काटे, फजल शेख, अरुण बोऱ्हाडे, वैशाली काळभोर आदी उपस्थित होते. तहसीलदारांना दिलेल्या सनदीत पक्षाने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करून त्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून द्यावी, सरकारमार्फत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, औषधे बांधावर उपलब्ध करून द्यावीत, अल्पभूधारक शेतकऱ्यांना किमान तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट शून्य टक्‍के व्याजदराने द्यावे, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उच्च शिक्षण आणि सर्व शिक्षणासाठी प्रवासाची मोफत सोय करून द्यावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला उभारी देण्यासाठी विशेष योजना तयार कराव्यात, शेतीमालाला आधारभूत किमतीच्या दीडपट किंमत देऊन त्यांच्या मालाची खरेदी सरकारने करावी, नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना सरकारने मदत करावी, शेततळ्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करून ते एक लाख रुपये करावे, शेतीसोबत असणाऱ्या जोडधंद्यांना हातभार लावण्यासाठी विशेष योजना तयार करण्यात यावी, आदी मागण्या केल्या आहेत.

Web Title: farmer strike marathi news maharashtra news pimpri news