उरुळी कांचन येथे शेतकरी प्रशिक्षण व मेळावा

जनार्दन दांडगे
गुरुवार, 7 जून 2018

उरुळी कांचन - महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागमार्फत 'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' मोहिमे अंतर्गत हवेली तालुका कृषी विभागाच्या वतीने रोहिणी नक्षत्र पंधरवाड्यानिमित्त टिळेकरवाडी खामगाव टेक व नायगाव (ता. हवेली) येथे 'शेतकरी प्रशिक्षण व मेळावा' घेण्यात आला. 

उरुळी कांचन - महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागमार्फत 'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' मोहिमे अंतर्गत हवेली तालुका कृषी विभागाच्या वतीने रोहिणी नक्षत्र पंधरवाड्यानिमित्त टिळेकरवाडी खामगाव टेक व नायगाव (ता. हवेली) येथे 'शेतकरी प्रशिक्षण व मेळावा' घेण्यात आला. 

शेती उत्पादनात दुपटीने वाढ व्हावी यासाठी राज्य शासनाने 'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरु केलेल्या विविध योजना, ठिबक सिंचन अनुदान, शेतीचे यांत्रिकीकरण, अत्याधुनिक शेती अवजारे, हरितगृह, शेततळे, शेडनेट, पीक विमा योजना अशा योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. तसेच शेतातील मातीचे परीक्षण करून मातीचे नमुने तपासणीचे प्रात्यक्षिक व 'माती परीक्षण आरोग्य पत्रिके'चे वाटप करण्यात येत आहे.

टिळेकरवाडी खामगाव टेक येथे झालेल्या मेळाव्यामध्ये कृषी पर्यवेक्षक योगेश सुरवसे व कृषी सहाय्यक पूजा जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी 'यशवंत'चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर, सरपंच रोहिणी जगताप, उपसरपंच अमृत टिळेकर, माजी सरपंच नीता टिळेकर, कल्पना जगताप, ग्रामपंचायत सदस्या सारिका थोरात, ग्रामविकास अधिकारी सविता भुजबळ व शेतकरी उपस्थित होते. नायगाव येथे झालेल्या मेळाव्यादरम्यान शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करून कृषी सहाय्यक महेश सुरोडकर यांनी शेतकऱ्यांना 'माती परीक्षण आरोग्य पत्रिके'चे वाटप केले. यावेळी सरपंच प्रज्ञा साखरे, उपसरपंच कल्पना चौधरी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चौधरी, संतोष हगवणे, भाऊसाहेब माने, ग्रामविकास अधिकारी प्रविण देसाई व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmer training and malava at Uruli Kanchan