उंडवडीत शिरसाईच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरु

विजय मोरे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

उंडवडी - शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी योजनेच्या लाभार्थी गावातील पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उंडवडी कडेपठार येथे आज सकाळी दहा वाजल्यापासून एकदिवसीय ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. 

शिरसाई उपसा सिंचन योजनेची पाणी हे लाभार्थी सर्वच गावाना पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे, या मागणीसाठी आज उंडवडी कडेपठार, जराडवाडी, कारखेल, सोनवडी सुपे, गोजुबावी, उंडवडी सुपे आदी गावातील सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. 

यावेळी ठिय्या आंदोलनात "आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे." अशा घोषणाबाजी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

या भागात सद्या पाणी व जनावरांच्या चाऱ्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे शिरसाई उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र सदरच्या योजनेची पाणी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ठराविक ठिकाणीचं सोडले जात आहे. त्यामुळे अनेक पाझर तलाव पाण्यापासून वंचित राहणार आहेत.  लाभार्थी गावातील सर्वच पाझर तलाव, नाला माती नाला बांध, सिमेंट बधारे, ओढा खोलीकरण आदी शिरसाई योजनेतून भरण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप खैरे हे आंदोलनात सहभागी झाले होते. 

यावेळी उंडवडी कपचे सरपंच विशाल कोकरे, उंडवडी सुपेचे उपसरपंच पोपट गवळी, गजाबा सरक, श्रीकांत साळुंके, माजी सरपंच विठ्ठल जराड आदीनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

Web Title: farmers agitation for the water in undavdi