इंदापुरात शेतकऱ्यांची "आयडियाची कल्पना'

Shetkari
Shetkari

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या कामासाठी जुगाड तयार केल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीमधील कष्ट, श्रम, वेळ व पैसा वाचण्यास मोलाची मदत होत आहे.

शेतीमध्ये नुकतेच राबत राहिले व जास्त काबडकष्ट केले तर फायदा नाही. शेतीला आधुनिक तंत्राज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी मजुराची टंचाई भासत आहेत. मजुरांची संख्या कमी असल्यामुळे मजूर अव्वाच्या सव्वा मजुरी सांगत आहेत. कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मजुरांकडून शेती करणे परवडत नाही. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत आहेत.

दुग्धव्यवसायामध्ये जनावरांचा चाऱ्याची वाहतूक व इतर कामे शेतकरी स्वतः करत असतो; तसेच डोक्‍यावर चारा वाहून नेणे मोठ्या कष्टाचे काम असते. युवा पिढीने यावर मात करण्यासाठी जुगाड बनवला आहे. याचा उपयोग चारा व शेतमालाच्या वाहतुकीसाठी होत आहे. दोन चाकांचा गाडा तयार करून तो दुचाकीला जोडला आहे. यामुळे कमी वेळेमध्ये, कमी श्रमात व कमी खर्चामध्ये चाऱ्याची वाहतूक करणे शक्‍य होत आहे; तसेच या गाड्याचा वापर डाळिंबाची काढणी करताना शेतामध्ये डाळिंब वाहतुकीसाठी केला जातो.

माझ्याकडे पाच एकर क्षेत्र असून, दुग्धव्यवसाय आहे. पाच गाई असून 50 ते 60 लिटर दूध निघते. जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी जास्त वेळ व श्रम करावे लागते होते. आठ हजार रुपयांचा गाडा तयार केल्यामुळे दोन माणसांचे काम एका माणसात होत असून वेळही वाचत आहे.
- राहुल दिवसे, युवा शेतकरी

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com