खरीप हंगाम सुुरु होतोय; शेतकऱ्यांना सतावतेय 'ही' भीती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून सर्वत्र पेरण्याची धामधूम सुरू आहे ,असे असताना बहुसंख्य जाणकार शेतकरी भविष्यातील कोरोनाची वाटचाल कशी असेल? या भीतीमुळे पेरणीसाठी आखडता हात घेतला असल्याचे चित्र दिसत आहे

खळद : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र पूर्ण बिघडले असतानाच, आता खरीप हंगाम सुरु होत असल्याने शेतकऱ्यांना भविष्यातील मजूर टंचाईच्या भीतीने ग्रासले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून सर्वत्र पेरण्याची धामधूम सुरू आहे ,असे असताना बहुसंख्य जाणकार शेतकरी भविष्यातील कोरोनाची वाटचाल कशी असेल? या भीतीमुळे पेरणीसाठी आखडता हात घेतला असल्याचे चित्र दिसत आहे. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून या हंगामातील उत्पन्नातूनच त्याचा वर्षाचा उदरनिर्वाह होत असतो, यावेळी शेतकरी अनेक बागायती पिके घेतो यासाठी मोठ्या प्रमाणावर मजूर मजुरांची आवश्यकता असते. वेळप्रसंगी स्थानिक मजूर उपलब्ध झाले नाही तर, शेतकरी बाहेरगावावरून मजूर आणून आपली शेतातली कामे पूर्ण करतात मात्र, भविष्यात कोरोनीमुळे गावे लॉकडाऊन झाली तर, त्या ठिकाणचा मजूर हा बाहेर गावी मजुरीसाठी येईल की, नाही याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत खळद येथील प्रसिद्ध बागायतदार माजी सरपंच चंद्रकांत कामथे यांनी आम्ही यावर्षी काही मोजकीच पिके घेतली असून वाटाणा,टोमॅटो कांदा क्षेत्रामध्ये घट केली असून मोठी गुंतवणूक करण्याचे टाळले आहे,सध्या शेती व्यवसाय हा पूर्णपणे तोट्यात असून आता गुंतवणूक केली तर भविष्यात मजूर उपलब्ध झाले नाही तर मोठे नुकसान होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

'शरद पवारांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ माफी मागावी'​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers fear labor shortage Kharif season