आंबेगाव तालुक्यात उत्पादित बटाटा सडल्याने शेतकरी आर्थिक संकटात

Farmers in financial crisis due to rotting potatoes in Ambegav district
Farmers in financial crisis due to rotting potatoes in Ambegav district

सातगाव पठार : बटाटा पिकाचे आगार समजल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील पेठ आणि पारगाव तर्फे खेड या गावांमधील बटाटा उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला असून खूप मोठ्या अर्थिक संकटाला त्याला सामोरे जावे लागणार आहे. अतिपावसामुळे शेतातून काढून झालेला बटाटा सडत आहे तर दुसरीकडे बटाटा विक्रीस पाठवायचा म्हटले तर व्यापारी तो घेत नाहीत कारण त्यांच्याकडेही तो लगेचच दोन दिवसात सडत आहे. त्यामुळे आता करायचे काय याचीच चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सातगाव पठार भागात सात ते आठ हजार एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केली गेली आहे. या भागातील शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित याच पिकावर अवलंबून असते. त्यामुळे शेतकरी जिवाची बाजी लावून बटाटा पिकाकडे लक्ष देत असतो. यंदाही शेतकऱ्यांचे बटाटा पिक चांगले आले होते, त्यामुळे शेतकरी आनंदात होता. मात्र ज्यावेळी बटाटा पिक काढणीला आले त्याचवेळी सलग तीन दिवस मुसळधार पाऊस झाला, आणि शेतांमध्ये पाणी साचून राहीले. त्यामुळे काढणीला आलेला बटाटा काही प्रमाणावर शेतातच सडायला लागला. या भागातील पेठ आणि पारगाव तर्फे खेड या दोन गावांमध्ये बटाटा सडीचे प्रमाण अधिक आहे. तुलनेने कारेगाव, भावडी, थुगाव, कुरवंडी आदी गावांमध्ये हेच सडीचे प्रमाण काही प्रमाणावर कमी आहे.

शेतकऱ्यांनी शेतात अतिपावसामुळे पाणी साचलेले असताना, चिखल झालेला असताना बटाटे काढणीस सुरवात केली. कारण हे बटाटे वेळेतच काढणे गरजेचे असते. मात्र शेतकऱ्यांचे दुर्देव असे की, बटाटे काढताना खूप मोठया प्रमाणावर बटाटे सडलेले आढळले. त्यानंतर काढून झालेले बटाटे शेताच्या बांधावर आरण लावून ठेवण्यात आले, त्या आरणीतील बटाटेही दोनच दिवसांत सडायला लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेचच काढून झालेले बटाटे पिशव्यांमध्ये भरून विक्रीस पाठविण्यास सुरवात करण्याचे ठरवले तर समोर व्यापारी देखील बटाटा घेत नाहीत, कारण त्यांच्याकडे देखील गेल्यानंतर बटाटे सडत आहेत. त्यामुळे यावर्षी या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

ज्या शेतामध्ये दरवर्षी 125 पिशव्या बटाटे निघतात त्याच शेतात यावेळी फक्त 30 पिशव्याच बटाटे हातात राहीले आहेत. बाकीचे सर्व बटाटे सडल्याने टाकून दिले आहेत. जे बटाटे राहीलेत त्यालाही म्हणावा असा बाजारभाव मिळणार नाही, त्यामुळे आता आमचे भांडवल देखील वसूल होणार नाही. डोळयांत आश्रू आणत पारगाव तर्फे खेड ता.आंबेगाव येथील बटाटा उत्पादक शेतकरी नारायण बबन भागडे यांनी आपली खंत दै. सकाळशी बोलताना व्यक्त केली.

सातगाव पठार भागातील काही गावांतील बटाटे काढणीसुरू असतानाच सडलेले निघत आहेत. तसेच आरण लावून ठेवली तरी सडत आहेत. नेमका काढणीच्या वेळेला झालेल्या अतिपावसाचा फटका या पिकाला बसला असल्याने शेतकऱ्यांवर खूप मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागातील बटाटा पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी पेठ ता.आंबेगाव येथील बटाटा उत्पादक शेतकरी राम तोडकर यांनी केली आहे.

पुणेकरांची फसवणूक केलेल्या 'लाइफ़लाइन'ला जोरात टोचले इंजेक्शन; डिपॉझिट जप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com